Pfizer-BioNTech ची कोविड-19 लस 12-15 वयोगटातील मुलांसाठी वापरण्यास युरोपमध्ये मान्यता

12-15 वयोगटातील मुलांवर ही लस वापरण्यात येणार आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

फायझर-बायोएनटेकची (Pfizer-BioNTech) कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) लहान मुलांसाठी वापरण्यास युरोपीय मेडिसिन्स एजन्सीने (European Medicines Agency) मान्यता दिली आहे. 12-15 वयोगटातील मुलांवर ही लस वापरण्यात येणार आहे. युरोपीयन युनियनच्या 27 सदस्य देशांमध्ये लहान मुलांसाठी वापरण्यात येणारी ही पहिली लस असल्याची माहिती Xinhua न्यूज एजन्सी ने दिली आहे.

EMA च्या व्हॅक्सिन स्ट्रॅटचीचे मॅनेजर Marco Cavaleri यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीसंदर्भात आवश्यक डेटा मिळाला असून त्यानंतरच ही लस मुलांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डेटानुसार ही लस कोविड-19 विरुद्ध अत्यंत प्रभावशाली असल्याचे निर्दशनास आले आहे. या निर्णयाला युरोपीयन कमिशन आणि वैयक्तिक राष्ट्रीय नियामक यांच्याकडून मान्यता मिळण्याची गरज आहे. (William Shakespeare, युके मध्ये Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine घेणार्‍या पहिल्या पुरूषाचं 81 व्या वर्षी निधन)

अमेरिका आणि कॅनडामध्ये या लसीला यापूर्वीच मान्यता मिळाली असून टीनएजर्ससाठी ही लस वापरली जात आहे. अमेरिकेत 2200 पौगंडावस्थेतील मुलांवर केलेल्या अभ्यासावरुन ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे EMA ने या लसीची शिफारस केली आहे. 16-25 वयोगटातील व्यक्तींपेक्षा 12-15 वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे ट्रायल्सवरुन दिसून आले.

कोविड-19 चा संसर्ग रोखण्यापासून ही लस 100 टक्के परिणामकारक असल्याचे अभ्यासातून समोर आले असल्याचे EMA ने एका वक्तव्यात म्हटले आहे. 16 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना होणारे लसीचे सामान्य दुष्परिणाम हे 12-15 वयोगटातील मुलांमध्ये देखील दिसून आले आहे. यामध्ये थकवा, डोकेदुखी, सांधेदुखी, थंडी आणि ताप यांसारखे साईड इफेक्ट्स पाहायला मिळाले.