Papua New Guinea landslide: पापुआ न्यू गिनी भूस्खलनात 2,000 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे संयुक्त राष्ट्रांना मदतीच्या मागणीचे पत्र

तेथे बचावकार्यातही अनेक अडथळे येत आहेत.

Photo Credit -X

Papua New Guinea landslide: पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 2000 लोक ढिगाऱ्याखाली अडकले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीएनएनने देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा हवाला देऊन अहवाल दिला आहे.पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे (Papua New Guinea landslide)सुमारे 2000 लोक ढिगाऱ्याखाली अडकले (buried)गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी  मे 24 रोजी झालेल्या पापुआ न्यू गिनी देशाच्या उत्तर पर्वतीय एन्गा प्रदेशात भूस्खलन झाले. अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला आहे. (हेही वाचा:Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; 670 हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे वृत्त)

या भूस्खलनात सुमारे 100 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात येत आहे. तर, देशातील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) च्या अंदाजानुसार, हाच आकडा 670 पर्यंत पोहचल्याचे सांगण्यात आले आहे.

'भूस्खलनामुळे 2,000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले. इमारती, पिके, फळ बागांचे मोठे नुकसान झाले. देशाच्या आर्थिक जीवनरेषेवर त्याचा मोठा परिणाम झाला,' असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यवाहक संचालक लुसेटे लासो माना यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यानी पत्रात पुढे लिहिले आहे की,'अजूनही काही भागात भूस्खलन होत आहे. परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे बचाव पथकाला आणि वाचलेल्या दोघांना बाहेर काढण्यात अडथळे निर्माण होत आहेत,'असे ते म्हणाले, 'भूस्खलनामुळे मुख्य महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्वरित मदतीची आवश्यकता आहे,' लुसेटे लासो माना म्हणाले.