Pakistan’s Schools Closed Heat Wave Warning: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात उष्णतेची तीव्र लाट, 25 ते 31 मे पर्यंत सर्व शाळा राहणार बंद
यामुळे 25 ते 31 मे पर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद राहणार आहेत. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन शाळांना वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यास परवानगी दिली जाईल.”
Pakistan’s Schools Closed Heat Wave Warning: पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात कडक ऊन आहे. यामुळे 25 ते 31 मे पर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद राहणार आहेत. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन शाळांना वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यास परवानगी दिली जाईल.” वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, पाकिस्तान हवामान विभागाने (पीएमडी) गेल्या आठवड्यात सांगितले होते, " वातावरणात उच्च दाबाच्या उपस्थितीमुळे, देशातील बहुतांश भागात, विशेषतः पंजाब आणि दक्षिण सिंध प्रांतात 21 मे पासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. "
याशिवाय 23-27 मे रोजी कडक उष्मा होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. नागरिकांनी कडक उन्हात विनाकारण घराबाहेर पडू नये आणि जास्त पाणी पिण्याचे आवाहन विभागाने केले होते.