Pakistan: मे महिन्यात 134 टक्क्यांनी वाढली पाकिस्तानची व्यापारातील तूट, सरकारच्या अडचणींत वाढ
गेल्या वर्षात ती 1.466 बिलियन होती पण आता वाढून 3.432 बिलियन डॉलर झाली आहे. ही स्थिती एक्सपोर्टमध्ये घट आणि इंपोर्टमध्ये वाढ झाल्याच्या कारणामुळे निर्माण झाली आहे.
पाकिस्तानची (Pakistan) व्यापारिक तूट यंदाच्या वर्षातील मे महिन्यात 134 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात ती 1.466 बिलियन होती पण आता वाढून 3.432 बिलियन डॉलर झाली आहे. ही स्थिती एक्सपोर्टमध्ये घट आणि इंपोर्टमध्ये वाढ झाल्याच्या कारणामुळे निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या द डॉन नुसार देशातील वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी याची आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, व्यापारात नुकसान झाल्याच्या कारणास्तव देशातील सरकारच्या समोर अनेक अडचणी उद्भवू शकतात. त्याचसोबत आपल्या एक्सटर्नल अकाउंटवर नियंत्रण मिळवणे मुश्किल होऊ शकते. हे नुकसान जर रुपयांत पाहिल्यास तर वर्षाला 125 टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या नुसार वर्ष 2020 पासून आयात आणि निर्यातीत दरम्यानचे अंतर वाढत चालले आहे. आकडेवारीनुसार, यापूर्वी व्यापारिक तूट जवळजवळ 32 बिलियन डॉलर कमी होऊन 23 बिलियन डॉलरवर आली होती.
द डॉन यांनी असे लिहिले की, सरकारच्या समोर आता एक गंभीर समस्या उद्भवली आहे. ती म्हणजे आपले इंपोर्ट कसे वाढवू शकतो. सरकारचे असे म्हणणे आहे की, हे नुकसान वाढण्यामागील कारण म्हणजे पेट्रोलियम, गहू, साखर, सोयाबीन, कच्चा माल आणि केमिकल,मोबाईल फोन, फर्टीलायझर, टायर,औषधे आणि लसी यांची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली आहे. असे ही म्हटले जात आहे की, ज्या पद्धतीची सध्या परिस्थिती आहे ती पाहता सध्याच्या आर्थिक वर्षात जून मध्ये संपेपर्यंत सध्याचे नुकसान 4 ते 6 बिलियन डॉलर दरम्यान असू शकते.
तसेच वॅल्यू अॅडेड सेक्टरने सरकारला येत्या दिवसात कच्च्या मालाची कमतरता येणार असल्याचा सुद्धा इशारा दिला आहे. त्याचसोबत सूती धागा त्यांना पुरेशा प्रमाणात सुद्धा उपलब्ध होऊ न शकल्यास त्यांच्याकडील मालाची निर्यातची ऑर्डर दुसऱ्याला दिली जाऊ शकते. दरम्यान, सरकारने सुती धाग्यावरील इंपोर्ट ड्युटी आणि कर रद्द केला आहे.
दरम्यान, देशात इमरान खान यांचे सरकार आल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिघडली आहे. देशातील महागाई सातत्याने वाढत चालली आहे. याचा देशाच्या विकासावर जबरदस्त फटका बसला आहे. देशात खाण्यापिण्याच्या गोष्टींचे दर खुप वाढले आहेत. ऐवढेच नव्हे तर पाकिस्तानवर अन्य देशांचे कर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.