IPL Auction 2025 Live

Pakistan Shocker: देखभाल भत्त्याच्या कारणावरून पत्नीसोबत वाद, दोन मुलींना कालव्यात फेकले, एकीचा मृत्यू

या घटनेत एकीचा मृत्यू झाल्याचेही समजते आहे.

Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Pakistan Shocker: पाकिस्तान (Pakistan) देश सध्या मोठ्या आर्थिक संकटांना सामोर जात आहे. आर्थिक अडचणीमुळे नागरिक त्यांच्या नातेवाईकांचा खून करत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतनाच हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पाकीस्तानमधील वृत्तवाहिनी ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीसोबतच्या वादातून (Husband wife fight) एकाने त्याच्या दोन लहान मुलींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने चक्क मुलींना एका कालव्यात (canal) ढकलले. या घटनेट एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फहिम जावेद असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या 8 आणि 10 वर्षांच्या मुलींना पाण्यात ढकलले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 8 वर्षांच्या मुलीला वाचवण्यात आले असून 10 वर्षांची मुलगी खोल पाण्यात बुडल्याने तिचा मृत्यू झाला. फहिम जावेद याने दोन्ही मुलींना चेचावतनी येथे कालव्यात फेकून दिले होते. फहीम जावेद याला अटक करण्यात आली असून पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्लर कहार येथील रहिवासी असून त्याचा पत्नीशी देखभाल भत्त्यावरुन त्याचा वाद सुरू होता. त्याच्या पत्नीनेही देखभाल भत्ता मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. किरकोळ वादातून किंवा आर्थिक समस्यांवरून लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकत असल्याच्या घटना सध्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

3 मे रोजी अशाच एका घटनेत फैसलाबादमध्ये आर्थिक अडचणींवरून एका व्यक्तीने आपल्या दोन पत्नी आणि चार मुलांचा खून करून आत्महत्या केली होती. फैसलाबादच्या गुलशन-ए-मदिना कॉलनीत ही घटना घडली, असे एआरवाय न्यूजने म्हटले आहे. तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय काझिम जवाद याने आधी आपल्या पत्नींना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:वर बंदूक रोखण्यापूर्वी तीन मुली आणि एका मुलासह चार मुलांचा खून केला.

व्यवसायात सतत तोटा आणि कर्ज वाढत असल्याने काझिमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबाराचा आवाज ऐकून या घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आल्यावर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन तपासणीसाठी रुग्णालयात हलवले, एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे.