Pakistan: निर्लज्जपणाचा कळस! मागच्या वर्षी तुर्कस्तानने पाकिस्तानला पुरात पाठवलेले पाकिटे पाकिस्तानने पुन्हा तुर्कीला 'भूकंप मदत'च्या नावाने पाठवली
सिंधहून माल तेथे पोहोचला आहे. त्यावर पाकिस्तान सरकारचा टॅग चिकटवण्यात आला होता. त्यांनी पाकिटं उघडले तेव्हा आतून बाहेर आलेल्या पाकिटावर लिहिले होते, 'तुर्कीकडून प्रेमाने...'. तुर्कीने पुराच्या दिवसांत जो माल पाठवला होता, तो पुन्हा पॅक करून परत तुर्कीला पाठवण्यात आला होता. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
Pakistan: पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मागच्या वर्षी तुर्कीने पाकिस्तानने मदतीचा हात दिला होता. तुर्कीने पाकिस्तानला काही मदत सामग्री पाठवली होती. हीच सामग्री आता पाकिस्तानने तुर्कीला पुन्हा पाठवली आहे. यापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, शहरे अक्षरक्ष: कचऱ्यात बदलली. संपूर्ण जग तुर्की आणि सीरियासाठी प्रार्थना करत आहे आणि अनेक देश मदत सामग्री पाठवत आहेत. गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्ताननेही तुर्कस्तानला मदत पाठवली आहे. मात्र तेथील लोकांनी हे साहित्य उघडून पाहिले, तेव्हा सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला. मागच्या वर्षी तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठवलेली हीच मदत सामग्री पाकने पुन्हा तुर्कीला पाठवली. एका पाकिस्तानी पत्रकाराने एका वृत्तवाहिनीवर हा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या एका वरिष्ठ पत्रकाराने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दावा केला की, इस्लामाबादने अंकाराला पाठवलेले भूकंप मदत साहित्य हे खरे तर गेल्यावर्षीच्या पुरानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेली सामग्री होती. पाकिस्तानी वृत्तवाहिनी GNN वर पत्रकार शाहिद मसूद यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ स्वतः तुर्कीला पाठवल्या जाणाऱ्या मदतीवर लक्ष ठेवून असताना त्यांनी हा दावा केला आहे. (हेही वाचा -Pakistan Bankrupt: पाकिस्तान झाला 'दिवाळखोर'; संरक्षण मंत्र्यांनी जाहीरपणे केले मान्य, म्हटले- 'आता जमिनी विकण्याशिवाय कोणताच पर्याय नाही')
शाहिद मसूद यांनी सांगितलं आहे की, 'तुर्कीतून एक विचित्र बातमी येत आहे. सिंधहून माल तेथे पोहोचला आहे. त्यावर पाकिस्तान सरकारचा टॅग चिकटवण्यात आला होता. त्यांनी पाकिटं उघडले तेव्हा आतून बाहेर आलेल्या पाकिटावर लिहिले होते, 'तुर्कीकडून प्रेमाने...'. तुर्कीने पुराच्या दिवसांत जो माल पाठवला होता, तो पुन्हा पॅक करून परत तुर्कीला पाठवण्यात आला होता. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे,' असंही शाहिद मसूद यांनी म्हटलं आहे. मात्र, अद्याप या दाव्याला पुष्टी मिळालेली नाही.
विनाशकारी भूकंपानंतर तुर्की मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहे. तुर्कीमध्ये आतापर्यंत 38,044 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील अनेक देश तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मदत सामग्री पाठवत आहेत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे जो स्वतःच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक टप्प्याचा सामना करत आहे.