आता भारतासोबत बोलून काहीच फायदा नाही दिली युद्धाची धमकी,पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान संतापले
त्यामुळे आता परमाणु युद्धाची धमकी त्यांनी भारताला दिली आहे.
पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी आता भारतासोबत (India) बोलून काहीच फायदा नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता परमाणु युद्धाची धमकी त्यांनी भारताला दिली आहे. विदेशातील एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, इमरान खान यांनी असे म्हटले आहे की मी भारतासोबत वारंवार बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माझ्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी सुद्धा माझ्या सोबत बोलणे टाळले आहे.
आता भारतासोबत युद्ध करणे हेच योग्य अशी भुमिका इम्रान खान यांनी घेतली आहे. तर युद्धाशिवाय आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असे ही इमरान खान यांनी म्हटले आहे. पाठनकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात योग्य कारवाई केली जात नाही तो पर्यंत पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचे बोलणे होणार नाही. तसेच दहशतवाद किंवा अन्य मुद्द्यांवरुन इमरान खान यांनी बोलण्यासाठी भारताकडे अपील केले होते.(पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर संयम बाळगावा, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला)
तसेच नरेंद्र मोदी यांनी काश्मीर बाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना येथे हिंदुत्ववाद निर्माण करत मुस्लिमांना घालवायचे असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. त्याचसोबत परमाणु युद्धाची धमकी देत दोन्ही देशाची समोरासमोर ताकद किती आहे हे कळून येईल असे ही खान यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर कश्मीर मध्ये अधिकाधिक तणावाची स्थिती मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे झाली आहे. ही आमच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे.