पाकिस्तानमध्ये चक्क कोंबडी घोटाळा? वाटपाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार
मात्र या वाटपाच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सध्याच्या सरकारवर होत आहे.
लाहोर : जगात जमिनींचे, यंत्रांचे, शस्त्रांचे घोटाळे होतात मात्र पाकिस्तान (Pakistan) मध्ये चक्क कोंबडी घोटाळा झाला असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून पोल्ट्री फार्म योजना सुरु केली. या योजनेंतर्गत लोकांना चक्क कोंबड्या वाटण्यात आल्या. इम्रान यांच्या पोल्ट्री फार्ममधून सरकारी अधिकाऱ्यांमार्फत या कोंबड्या देण्यात येत आहेत. मात्र या वाटपाच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सध्याच्या सरकारवर होत आहे.
पाकिस्तानमध्ये गरीबीचे प्रमाण जास्त आहे, शिक्षणाचा अभाव आहे यामुळे बेरोजगार तरुणांची संख्याही अधिक आहे. हा सर्व विचार करून सरकारने ग्रामीण भागात घरोघरी कोंबड्या आणि अंडे पुरवण्याची अभूतपूर्व योजना काढली. यामुळे पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळेल आणि गरीबी दूर होण्यास मदत होईल असे सरकारचे मतं आहे.
नुकताच ठिकठिकाणी या कोंबडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मात्र यामध्ये फार गोंधळ उडाला. कित्येक गरिबांना त्यांच्या वाट्याची कोंबडी मिळालीच नाही. तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईक आणि जवळीक असलेल्यांनाच या कोंबड्या देण्यात येत असल्याचा आरोप लाहोर येथील नागरिकांनी केला आहे. कोंबडीनंतर आता सरकारने कोबंडे देण्याचीही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे एका व्यक्तीला 10 कोंबडे देण्यात येणार आहेत.