पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची कोरोना चाचणी; COVID-19 पॉझिटिव्ह समाजसेवी व्यक्तीची झाली होती भेट

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांची काल, 21 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी झाली आहे येत्या 24 तासात त्यांच्या टेस्टचे अहवाल समोर येतील

इमरान खान (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan)  यांची काल, 21 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी झाली आहे येत्या 24 तासात त्यांच्या टेस्टचे अहवाल समोर येतील दरम्यान खबरदारी म्ह्णून इमरान खान हे स्वतःच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता आहे. 15 एप्रिल रोजी इमरान खान यांनी इधी फाउंडेशन च्या फैसल इधी (Faisal Idhi) यांची भेट घेतली होती. काही दिवसांनीच इधी यांना ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून आली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली यात त्यांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह इधी यांच्या संपर्कात आलेल्या इमरान खान यांना सुद्धा कोरोनाची चाचणी करावी लागली. Coronavirus: आव्हान अजून संपले नाही!; चीनमध्ये पुन्हा 11 जण आढळले COVID-19 संक्रमित; कोरोना बाधितांचा आकड़ा वाढला

यापूर्वी सुद्धा इमरान खान यांची कोरोनाची चाचणी होणार असल्याच्या चर्चा होत्या, त्यावेळेचा उद्देश हा पाकिस्तानचे पंतप्रधान किती जबाबदार आहेत हे देशाला दाखवून देणे आणि परिणामी कोरोनाची चाचणी करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे असा होता. मात्र आता कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने इमरान खान यांना चाचणी करणे अनिवार्य झाले होते.कोरोना व्हायरस नीचे से भी घुस सकता है, टांगे प्रोटेक्ट करो! पाकिस्तानी मंत्री डॉ. फिरदौस आशिक अवान यांचा अजब सल्ला (Watch Video)

दरम्यान, इधी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. इधी ही पाकिस्तानातील वैद्यकीय विभागातील मोठी संस्था असून अलीकडेच त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी इमरान खान पंतप्रधान निधी मध्ये 1 कोटींची मदत केली होती.  दुसरीकडे, पाकिस्तान येथे कोरोनाचे संकट इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मंगळवार 21 एप्रिल रोजी पाकिस्तानातही 16 नागरिकांचा कोरोनामुळेमृत्यू होऊन देशातील मृतांची संख्या 192 वर पोहचली आहे. तसेच देशात आतापर्यंत 9 हजार कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Tulsi Gowda Passes Away: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वृक्ष माता तुलसी गौडा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद