Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव प्रकरणात तिसरा Consular Access देण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला ऑफर

पाकिस्तानने केवळ त्यांच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचेही उल्लंघन केले आहे.

Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तानी (Pakistan) कारागृहात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना तीसरा कॉन्‍सुलर एक्सेस (Consular Access) देण्यासबंधी पाकिस्तानने भारताला ऑफर दिली आहे. तसेच भारताच्या मागणीनुसार कॉन्‍सुलर एक्सेस मिटींगवेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित राहणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी म्हटल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.

दरम्यान, या आधी पाकिस्तानने भारताला कुलभूषण जाधव प्रकरणात दुसऱ्यांदा कॉन्सुल एक्सेस देण्यासाठी मंजूरी देली होती. ज्यानंतर भारतीय दुतांनी पाकिस्तानच्या एका अज्ञात ठिकाणी कुलभूषण जाधव यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, पाकिस्तानच्या अडमुट्या धोरणामुळे कुलभूषण जाधव यांच्यासोबत त्याही वेळी योग्य ती चर्चा होऊ शकली नव्हती. (हेही वाचा, Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांना दुसर्‍यांदा देण्यात आला Consular Access; पाकिस्तानी मीडियाची माहिती)

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताने पाकिस्तानकडे काही मागण्या ठेवल्या आहेत. ज्यात इतर कोणत्याही व्यक्तिच्या उपस्थितीशिवाय केवळ कुलभूषण जाधव यांच्यासोबत चर्चा करण्याच्या मागणीचा समावेश आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आधीच हे स्पष्ट केले आहे की, कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानेच वर्तन आणि भूमिका अतिशय असंवेदनशील राहिली आहे. पाकिस्तानने केवळ त्यांच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचेही उल्लंघन केले आहे.