पाकिस्तान मध्ये आढळले 1300 वर्ष जुन्या भगवान विष्णू मंदिराचे अवशेष

सुमारे 1300 वर्षांपूर्वी हे मंदिर हिंदू शाही काळात काही हिंदूनी बांधलं असावं असा अंदाज आहे.

Lord Vishnu's 1,300-Years-Old Temple Discovered in Pakistan (Photo CRedits: Twitter)

सुमारे 1300 वर्ष जुनी बांधणी असलेलं एक हिंदू मंदिर पाकिस्तानमध्ये उत्खननात आढळल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्त्व विभागातील तज्ञांनी दिली आहे. दरम्यान हा शोध स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडाई (Barikot Ghundai) मध्ये डोंगरावर खोदकाम करताना आढळलं आहे.

काही दिवसांपूर्वी Khyber Pakhtunkhwa Department of Archaeology च्या फजले खलीक यांनी या हिंदू मंदिराची माहिती देताना हे भगवान विष्णूचं मंदिर असल्याचं म्हटलं आहे. सुमारे 1300 वर्षांपूर्वी हे मंदिर हिंदू शाही काळात काही हिंदूनी बांधलं असावं असा अंदाज आहे. हिंदू शाही किंवा काबुली शाही (850 1026 CE) या हिंदू घराण्याने काबूल वॅली (पूर्वअफगानिस्तान), गंधार (आधुनिक पाकिस्तान) आणि सध्याचा उत्तर पश्चिम भारत भागात राज्य केले होते.

खोदकामामध्ये मंदिराच्या जागेजवळ छावणी आणि पहारेदार जेथे राहत होते त्याचे देखील निशाण मिळाले आहेत. मंदिराजवळ एक पाण्याचचा कुंडदेखील आढळला आहे. असे सांगितले जाते की हिंदूंद्वारा तेथे पूजा अर्चना करण्यापूर्वी आंघोळ केली जात असे. अयोद्धा: राम मंदिर निर्मितीच्या खोदाकामामध्ये प्राचीन मुर्त्या, शिवलिंग सापडल्याचा दावा; पहा सुब्रमण्यम स्वामींची प्रतिक्रिया.

दरम्यान स्वात हा जिल्हा पाकिस्तानमधील टॉप 20 अशा जागांपैकी आहे येथे प्राकृतिक सुंदरता, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि पुरातत्त्व स्थळांसारखी प्रत्येक पर्यटनांचा समावेश आहे. स्वात जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माची देखील अनेक प्रार्थनास्थळं आहेत.