पाकिस्तान म्हणतो आम्ही आर्थिक संकटातून सावरतोय, गव्हर्नर तारिक बाजवा यांचा दावा

तर आता कहरच झाला असून पाकिस्तानने मित्र देशाच्या मदतीने त्यांची आर्थिक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचा दावा केला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पाकिस्तानने (Pakistan) पुलवामा (Pulwama) हल्ल्यानंतर आज मंगळवारी एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी आपल्यावर भारताने केलेले आरोप फेटाळून लावली असल्याची भुमिका पार पाडली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही डबघाईला येऊन पोहचत होती. तर आता कहरच झाला असून पाकिस्तानने मित्र देशाच्या मदतीने त्यांची आर्थिक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचा दावा केला आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ पाकिस्तान गव्हर्नर तारिक बाजवा यांनी माहिती दिली आहे.

सौदीच्या राजपुत्राने पाकिस्तानमध्ये 20 अरब डॉलरची गुंतवणुक केल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे. तर पाकिस्तान वृत्तपत्र डॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजवा यांनी एका विद्यापीठाच्या कार्यक्रमादरम्यान, पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटाच्या कचाट्यातून वरती आली आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती पावले उचलली आहेत असे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा-Pulwama Terror Attack: भारताने युद्ध छेडल्यास जशास तसे उत्तर देऊ - इम्रान खान; पुलवामा हल्ल्याचे भारताचे आरोप फेटाळले)

इम्रान खान यांच्या सरकामुळे पाकिस्तानात उत्पन्न वाढले असल्याचे बाजवा म्हणाले. त्याचसोबत खान यांनी चीन, सौदी, अरब, संयुक्त अरब अमिरत या देशांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आणली असल्याचा दावा ही बाजवा यांनी यावेळी केला आहे.