पाकिस्तान: माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशरर्फ (Pervez Musharraf ) यांना विशेष कोर्टाकडून देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची (Death Penalty) शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Pervez Musharraf (Photo Credit:Twitter@APMLOfficial)

पाकिस्तानचे माजी  राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf ) यांना विशेष कोर्टाकडून देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची (Death Penalty)  शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज, (17 डिसेंबर) मुशरर्फ त्यांच्यावरील खटल्याची अंतिम सुनावणी होती यामध्ये, पेशावर उच्च न्यायालयाचे (Peshawar High Court) मुख्य न्यायाधीश वकर अहमद (Wakar Ahmad) यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय सुनावला. (पाकिस्तानला भीती, भारत दुप्पटीने परमाणू बॉम्ब हल्ला करुन आपल्याला संपवेल- परवेज मुशर्रफ)

यापूर्वी विशेष न्यायालयाने या प्रलंबित देशद्रोह खटल्यावर 17 डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याची घोषणा केली होती, वास्तविक त्यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण न होता देखील ही घोषणा केल्याने अनेक प्रश्न उभारले गेले होते, मात्र आज अखेरीस या खटल्यावरी निर्णय आला असून लवकरच मुशर्रफ यांना फाशीवर चढवण्यात येईल.

ANI ट्विट

प्राप्त माहितीनुसार या खटल्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आहे, तीन न्यायधिशांपैकी दोघांनी मुशर्रफ यांच्याविरुद्ध निर्णय दिल्याचे समजते. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नवाझ शरीफ यांच्या सरकारने परवेझ मुशर्रफ यांच्या विरुद्ध नोव्हेंबर 2007 च्या संविधानबाह्य अतिरिक्त आणीबाणी वरून याचिका दाखल केली होती.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Pakistan vs West Indies, 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दुसऱ्या डावात पाकिस्तानने तीन विकेट गमावून 109 धावा केल्या आणि घेतली 202 धावांची आघाडी

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार

Share Now