पाकिस्तानमध्ये चीनी इंजिनियर्सवरील हल्ल्यामागे RAW चा हात, कुरैशी यांचा भारतावर आरोप

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी असा आरोप लावला आहे की, खैबर पख्तूनख्वाचे दासू हाइड्रोपावर प्रोजेक्टवर काम करणाऱ्या चीनी इंजिनिअर्सच्या बसवर झालेल्या हल्ल्यामागे भारतीय गुप्त एजेंसी रॉ (RAW) यांचा हात आहे.

Shah Mahmood Qureshi | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानने (Pakistan) चीनी इंजिनिअर्सवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यावरुन भारतावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी असा आरोप लावला आहे की, खैबर पख्तूनख्वाचे दासू हाइड्रोपावर प्रोजेक्टवर काम करणाऱ्या चीनी इंजिनिअर्सच्या बसवर झालेल्या हल्ल्यामागे भारतीय गुप्त एजेंसी रॉ (RAW) यांचा हात आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांनी असे ही म्हटले की, अफगाणी एनएसएच्या ऑफिस राष्ट्रीय सुरक्षा निर्देशालयाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.

14 जुलै रोजी झालेल्या या बॉम्ब स्फोटात चीनी इंजिनिअर्ससह एकूण 13 जण ठार झाले होते. हल्ल्यानंतर त्यांची बस दरीत कोसळल्याने त्यामध्ये बहुतांशजण हे जखमी सुद्धा झाले. चीनने या घटनेसंबंधित पाकिस्तानावर कठोर नाराजी व्यक्त केली. प्रकरण ऐवढे वाढले की, चीनला मनवण्यासाठी इमरान खान यांनी शाह महमूद कुरैशी आणि आयएसआय चीफ लेफ्टिनेंट जनरल फैज हामिद यांचा पेइचिंग येथे पाठवावे लागले होते.(पाकिस्तान मध्ये तोडण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे पुननिर्माण, आतापर्यंत 50 जणांना करण्यात आली अटक)

इस्लामाबाद मध्ये कुरैशी यांनी आरोप लावला की, हल्ल्या दरम्यान अफगाणी जमीनचा वापर केला होता. त्याचसोबत असा ही दावा केला, वापरण्यात आलेले वाहन हे पाकिस्तानात तस्करी करुन आणण्यात आले होते. पाकिस्तान तपास यंत्रणेची बाजू घेत त्यांनी असे ही म्हटले की, ही एक ब्लाइंड केस असली तरीही पाकिस्तानकडून या शोध घेतला जाईल.(Afghanistan-Taliban: अफगाणिस्तान-तालिबानमध्ये संघर्ष अद्याप कायम, भारतीयांना विशेष विमानाने आणणार घरी)

पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी असे ही पुढे म्हटले की, 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी घटनेच्या संचालकांचा शोध घेतला असून ते कुठे आहेत हे सुद्धा माहिती आहे. त्याचसोबत ते कोणासोबत जोडले गेले आहेत असे म्हटले आहे. वापरण्यात आलेले वाहन पाकिस्तानात तस्करी करुन आणले आहे. त्यांनी असा ही दावा केला की, हल्लेखोर खालिद उर्फ शेख हा अफगाणचा नागरिक होता.