Pakistan General Elections 2024: हिंसाचार, राजकीय अनिश्चितता, आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात मतदानाला सुरुवात

नवाझ शरीफ हे पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे

Image Credit - Twitter ANI

पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंसाचाराचे वातावरण असतानाच दुसरीकडे आज देशभरात सर्वत्रिक निवडणूक (General Election) होत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तुरुंगात आहे. नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांच्यात मुख्य लढत आहे. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे. नवाझ शरीफ हे पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे कारण त्यांना पाकिस्तान लष्कराकडून मोठा पाठींबा हा मिळत आहे. (हेही वाचा - Cipher Case: पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास)

पाहा व्हिडिओ -

पाकिस्तानात निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने देशभरात एकूण 90,7675 मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पुरुष मतदारांसाठी 25,320, महिलांसाठी 23,952 आणि इतरांसाठी 41,402 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 44 हजार मतदान केंद्रे सामान्य आहेत, तर 29,985 संवेदनशील भागात आहेत. तर, 16,766 अतिसंवेदनशील आहेत.

या निवडणुकीत देशातील 12.85 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील केल्यात. मतदान अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आले. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे पाकिस्तानमधील नागरिकांसह जगाचे लक्ष लागले आहे.