Pakistan: पाकिस्तानात कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये बॉम्बस्फोट, 10 ठार, 6 जखमी

बलुचिस्तानमधील हरनई भागात कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात १० जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हरनाईचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरनाईच्या शहरग जिल्ह्यातील 'पीएमडीसी ९४' या कोळसा खाण क्षेत्रात आयईडीमुळे हा स्फोट झाला. पुरावे गोळा केले जात असून रस्त्याच्या कडेला स्फोटक साहित्य ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे

Pakistan

Pakistan: बलुचिस्तानमधील हरनई भागात कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात 10  जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  हरनाईचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरनाईच्या शहरग जिल्ह्यातील 'पीएमडीसी 94' या कोळसा खाण क्षेत्रात आयईडीमुळे हा स्फोट झाला. पुरावे गोळा केले जात असून रस्त्याच्या कडेला स्फोटक साहित्य ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेचा निषेध केला असून जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जखमी कामगारांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बुगती म्हणाले की, बलुचिस्तान सरकार लोकांच्या जीवित आणि सुरक्षिततेसाठी शक्य ते सर्व पावले उचलत आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करणारे दहशतवादी कोणत्याही माफीला पात्र नाहीत आणि बलुचिस्तानमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार् या घटकांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे ते म्हणाले. या घटनेतील दहशतवाद्यांना लवकरच शिक्षा होईल. अलीकडेच बलुचिस्तानमधील कलात जिल्ह्यातील मंगोचर शहरात झालेल्या कारवाईत पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सचे (एफसी) 18 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement