Pakistan Attack on Afghanistan: अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 46 वर; मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश
हाती आलेल्या ताज्या आकडेवारीत हल्ल्यामध्ये 46 लोक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. असे तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.
Pakistan Attack on Afghanistan: पूर्व अफगाणिस्तानवर (Afghanistan) पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात 46 लोक ठार झाले आहेत. ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे, असे तालिबान (Taliban) सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. अफगाण सरकारचे उप प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या (Akistan) सीमेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतात सहा जण जखमी झाले आहेत. (Pakistan Airstrike On Afghanistan: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू)
पाकिस्तान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतातील हा हल्ला प्रशिक्षण सुविधा उद्ध्वस्त करणे आणि बंडखोरांना मारणे यासाठी होता. दरम्यान, एका निवेदनात, पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे प्रवक्ते मोहम्मद खुरासानी यांनी दावा केला आहे की हल्ल्यांमध्ये 27 महिला आणि मुलांसह 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे.
हल्ल्यातील मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानने या हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या सत्ताधारी तालिबान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आणि मंगळवारी सांगितले की बहुतेक बळी वझिरीस्तान भागातील निर्वासित होते. या हल्ल्याचा तालिबान बदला घेण्याचे ही त्यानी दिले. TTP हा एक वेगळा गट आहे परंतु अफगाण तालिबानचा एक जवळचा मित्र आहे.