Pakistan Anti-Rape Ordinance: खबरदार! बलात्कार कराल तर नपुंसक करण्यात येईल, भारताशेजारील राष्ट्राने केला कडक कायदा

पाकिस्तानेचे राष्ट्रपति आरिफ अल्वी (Dr Arif Alvi) यांनी या कायद्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर त्याचे रुपांतर कायद्यात झाले आहे. बलात्कार विरोधी कायदा 2020 (Pakistan Anti-Rape Ordinance 2020) असे या कायद्याचे नाव आहे.

Pakistan Prime Minister Imran Khan | (Photo Credits: Facebook)

Anti-Rape Act Pakistan: बलात्कार (Rape) आणि स्त्रियांवरील अत्याचार आदी घटनांमुळे केवळ भारतच नव्हेत तर जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. खरे तर ही एक जागतिक समस्या होऊन भसली आहे. यावर पाकिस्तान सरकारने एक कडक कायदा राबविण्याचा निर्धार केला असून, नुकतीच या कायद्याला मंजूरीही दिली. पाकिस्तानेचे राष्ट्रपति आरिफ अल्वी (Dr Arif Alvi) यांनी या कायद्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर त्याचे रुपांतर कायद्यात झाले आहे. बलात्कार विरोधी कायदा 2020 (Pakistan Anti-Rape Ordinance 2020) असे या कायद्याचे नाव आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशभरात एक व्यवस्था बनविण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत चालणाऱ्या सर्व खटल्यांची सुनावणी अवघ्या 4 महिन्यांत करावी लागणार आहे.

पाकिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी धावत्या वाहनात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर या कायद्याबाबत विचार सुरु झाला. सप्टेंबर 2020 मध्ये वाहनातून आपल्या मुलासोबत निघालेल्या एका विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पाकिस्तानात घडली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. सिंध प्रांतातील काशमोर जिल्ह्यत एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलासोबत ही घटना घडली होती. या घटनेनंतर पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांचे सरकार बलात्कार विरोधी कायदा आणेल असे सुतोवाच केले होते.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बलात्कार विरोधी कायद्यांतर्गत दोषी व्यक्तीला नपुंसक बनविण्याचा कायदा प्रथमच करण्यात येत आहे. परंतू, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दोषीची परवानगी घेणेही आवश्यक असणार आहे. (हेही वाचा, Pakistan Debt: कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; सौदी अरेबियाचे Loan फेडण्यासाठी दिले तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज- Report)

कसा असेल कायदा?

या कायद्याच्या माध्यमातून नॅशनल डेटाबेस एंड रजिस्ट्रेशन अथॉरिटी (NADRA) च्या माध्यमातून देशभरातील लैंगिक अपराधात दोषी असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार केली जाईल. त्यासाठी अॅटी रेप क्रायसीस सेल बनविण्यात येईल. तसेच, आरोपी आणि पीडितेची घटना घडल्यानंतर अवघ्या 6 तासात वैद्यकीय चाचणी केली जाईल. तसेच या घटनेतील पीडित आणि आरोपीने ही चाचणी स्वत:हून करुन घेणे बंधनकारक असेन. यापुढे पाकिस्तानमध्ये बलात्कार पीडित व्यक्तीची ओळख उघड केली जाणार नाही. तसे घडल्यास तो एक दंडनीय अपराध समजला जाईल. सातत्याने लैंगिक शोषणाच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या गुन्हेगारास रसायन वापरुन नपुंसक केले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif