IPL Auction 2025 Live

पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी देणार नाही - इम्रान खान

पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी असे म्हटले आहे की, त्यांचे सरकार पाकिस्तानच्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी संघटनेचा थारा करणार नाही.

Imran Khan (Photo Credits- ANI)

पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर वाढत्या दबावामुळे पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी असे म्हटले आहे की, त्यांचे सरकार पाकिस्तानच्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी संघटनेचा थारा करणार नाही. त्याचसोबत देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या संघटनेलाही पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करु देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सर्व पार्टींनी हा निर्णय घेतला असून राष्ट्रीय कार्ययोजना अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

पाकिस्तानने इस्लामिक दहशतावाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. तसेच 182 मदरसे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याचसोबत पाकिस्तान मधून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित 100 दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले आहे.(हेही वाचा-दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करा,अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा)

यापूर्वीच्या सरकारने दहशतावाद्यांच्या विरोधात कारवाई केली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचे समजते. तर राष्ट्रीय योजनेइअंतर्गत आता दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सिंध येथील एका प्रांतातील सभेत खान यांनी म्हटले आहे.