Origins of Covid-19: चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला कोविड-19 विषाणू; FBI डिरेक्टर Christopher Wray यांचा मोठा दावा

याआधी 2021 मध्येही, यूएस फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दावा केला होता की कोरोना विषाणूची गळती चीनमधीलच एका प्रयोगशाळेतून झाली आहे. गुप्तचर संस्था अजूनही आपल्या संशोधनाच्या या निकालावर ठाम आहे.

Coronavirus प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit - Pixabay)

जगात कोरोना विषाणूचा (Covid-19) प्रसार होण्यासाठी पहिल्यापासून चीनला जबाबदार ठरवले जात आहे. आता एफबीआयचे (Federal Bureau of Investigation) संचालक क्रिस्टोफर रे (Christopher Wray) यांनी मंगळवारी सांगितले की, एजन्सीने मूल्यांकन केले आहे की कोविड-19 बहुधा चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला व त्यामुळे जगभरात महामारी पसरली.

डायरेक्टर क्रिस्टोफर रे यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, एफबीआयने दीर्घकाळ मूल्यांकन केले आहे की साथीच्या रोगाचा उगम वुहानमधील संभाव्य प्रयोगशाळेतील घटना आहे. ख्रिस्तोफर रे यांचे संपूर्ण विधान 5 पानांचे आहे.

सोमवारी, अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोनाव्हायरसशी संबंधित अंतिम अहवाल सादर केला. उर्जा विभागाने यापूर्वी सांगितले होते की, विषाणूची उत्पत्ती माहित नाही, परंतु आता विश्वास व्यक्त जात आहे की, विषाणू वुहान लॅबमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन संसदेचे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटचे सदस्य त्यांच्या वतीने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची सतत चौकशी करत आहेत. (हेही वाचा: Canada Bans TikTok: US, Britain पाठोपाठ आता Canada मध्येही टिकटॉक वर बंदी; सायबर सुरक्षेतून निर्णय)

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सोमवारी सांगितले की, यूएस सरकार साथीच्या रोगाच्या उत्पत्तीबद्दल निश्चित निष्कर्ष आणि एकमतापर्यंत अजूनतरी पोहोचलेले नाही. मात्र, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना यूएस बायोलॉजी लॅबकडून गुप्तचर माहिती मिळाली असून या इनपुटच्या आधारे अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या व्युत्पत्तीसाठी चीनला जबाबदार ठरवले आहे. परंतु हा अहवाल अत्यंत कमकुवत असल्याचेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे. व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल अनेक यूएस एजन्सींमध्ये अजूनही मतभेद आहेत.

याआधी 2021 मध्येही, यूएस फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दावा केला होता की कोरोना विषाणूची गळती चीनमधीलच एका प्रयोगशाळेतून झाली आहे. गुप्तचर संस्था अजूनही आपल्या संशोधनाच्या या निकालावर ठाम आहे. दरम्यान, कोविड-19 विषाणू पहिल्यांदा 2019 च्या उत्तरार्धात दिसून आला होता आणि तेव्हापासून उद्भवलेल्या महामारीमुळे जगभरात सुमारे 7 दशलक्ष लोक मरण पावले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now