Domino's मधून पिझ्झा ऑर्डर करणे पडले महागात; चिकनसोबत आढळले चक्क लोखंडी खिळे, नट आणि बोल्ट (See Photos)
या पदार्थांमध्ये फार कमी पौष्टिक घटक असतात मात्र तरी ते चवीने आणि आवडीने खाल्ले जातात. ऑनलाईन डिलिव्हरीचा ट्रेंड आल्यापासून तर लोकांना हे खाद्यपदार्थ घरी बसून खाण्याची संधी प्राप्त झाली आहे
सध्याच्या काळात लोकांमध्ये जंक फूडची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या पदार्थांमध्ये फार कमी पौष्टिक घटक असतात मात्र तरी ते चवीने आणि आवडीने खाल्ले जातात. ऑनलाईन डिलिव्हरीचा ट्रेंड आल्यापासून तर लोकांना हे खाद्यपदार्थ घरी बसून खाण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामध्ये पिझ्झा (Pizza) म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही पिझ्झा खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल. तर, यूकेच्या (UK) लँकशायरमध्ये राहणाऱ्या जेमा बार्टन यांनी डॉमिनोजमधून (Domino's) स्वतःसाठी एक पिझ्झा मागवला होता.
त्यांनी आवडीने हा पिझ्झा खाण्यास सुरुवात केली, तो अर्धा संपवलाही. त्यानंतर त्यांची नजर पिझ्झाच्या टॉपिंगवर पडली व त्यांना धक्काच बसला. त्यांना चिकनसोबत चक्क लोखंडी खिळे, नट आणि बोल्ट आढळले. पिझ्झामध्ये अशा धोकादायक गोष्टी पाहून जेमा आश्चर्यचकित झाल्या. जेमा यांनी हा पिझ्झा लँकशायरमधील थॉर्नटन-क्लीव्हलेस स्टोअरमधून ऑर्डर केला होता. पिझ्झामध्ये लोखंडी खिळे पाहून त्यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या ऑर्डरची संपूर्ण रक्कम परत मिळाली. त्याचवेळी स्टोअरने या निष्काळजीपणाबद्दल त्यांची माफीही मागितली. (हेही वाचा: Oven मध्ये शिजायला ठेवलेला माशाचा तुकडा उडतानाचा व्हिडिओ वायरल; नेटकर्यांनी केली भयपटातील सीन सोबत तुलना (Watch Video))
यानंतर जेमा यांनी आपल्या ऑर्डरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी त्यांनी लिहिले की, ‘थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे नेहमी सतर्क राहिले पाहिजे.’ ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, डॉमिनोजने म्हटले आहे की, ही बाब जुलैची आहे. या प्रकरणाची तक्रार मिळताच जेमाला परतावा देण्यात आला, जो त्यांनी स्वीकारला होता. यासोबतच पिझ्झा आउटलेटला इशाराही देण्यात आला होता. अशा परिस्थितीत, याबाबत पुन्हा पोस्ट करणे हा फक्त कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, याआधी पिझ्झा कंपनी डॉमिनोजच्या 18 कोटी भारतीय ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाल्याची बातमी आली होती. हॅकर्सने डार्क वेबवर या डेटासाठी सर्च इंजिन बनवले आहे. जिथे ग्राहकांची वैयक्तिक माहिती सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये लोकांचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि अगदी जीपीएस लोकेशनचाही समावेश आहे.