OMG: रूममेट चोरत असे खाद्यपदार्थ; बदला घेण्यासाठी महिलेने स्वतःच्याच अन्नात मिसळले विष

अनेक युजर्सनी साराच्या या युक्तीचे कौतुक केले आहे.

Sarah (संग्रहित संपादित प्रतिमा)

रूममेट्ससोबत (Roommates) हॉस्टेल किंवा फ्लॅटमध्ये राहताना काही लोक नेहमी आपल्या काही खास खाण्या-पिण्याच्या गोष्टी रूममेट्सपासून लपवून ठेवत असतात. तुम्ही देखील कधी ना कधी अशा गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला असेल. आपल्या अनुपस्थितीत रूममेट आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवर हात साफ करेल, अशी भीती त्यांना असते. आता याच संदर्भात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने फ्लॅटमेटपासून आपले खाद्यपदार्थ वाचवण्यासाठी असे काही केले ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.

सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी आपल्या दुधाच्या डब्ब्यामध्ये चक्क विष म्हणजेच मीठ (Salt) मिसळताना दिसत आहे. सारा (Sarah) नावाच्या महिलेने नुकताच टिकटॉकवर @saatj32 हँडलसह हा व्हिडिओ शेअर केला, जो पाहून लोक थक्क झाले. व्हिडिओमध्ये साराने सांगितले आहे की, तिचे खाद्यपदार्थ तिचे फ्लॅटमेट्स चोरायचे म्हणून ती आपल्या खाद्यपदार्थांमध्ये चक्क 'विष' घालत असे.

साराने स्वतःची एक रेकॉर्ड केलेली क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती ऑरगॅनिक ब्रिटीश स्किम्ड मिल्कचे कार्टन उघडताना दिसत आहे. त्यानंतर ती त्यात भरपूर मीठ मिसळते व दोन्ही व्यवस्थित एकत्र मिक्स करते. आता हे दूषित झालेले दूध ती पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते. याबाबत साराने सांगितले की, तिला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. (हेही वाचा: Eating Lots Of Sugar: जास्त साखर खाण्यामुळे होऊ शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या अधिक माहिती)

आपल्या अविवेकी रूममेट्समुळे साराला स्वतःच्या अन्नात ‘विष’ टाकण्यास भाग पाडले गेल्याची आठवण करून देणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो आता व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी साराच्या या युक्तीचे कौतुक केले आहे.