Oldest Saudi Man 5th Wedding: छंद लग्नाचा, वयाच्या 90 व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर; पठ्ठ्याचा स्वॅगच निराळा

मजेशीर असे की, 90 वर्षांचा हा उत्साही नवरदेव प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देतो आहे. बीया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, उत्साही नासेर बिन दाहैम बिन वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी याने इस्लामच्या तत्त्वांचे पालन करणे आणि सहवास वाढवणे याच्या महत्त्वावर जोर दिला. सुन्नत म्हणून विवाहावर खोलवर रुजलेला विश्वास व्यक्त केला.

Nasser bin Dahaim bin Wahq Al Murshidi Al Otaibi | (Photo Credits: Instagram)

Oldest Saudi Man 5th Wedding: वयाच्या नव्वदीत असलेला नासेर बिन दाहैम बिन वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी (Nasser bin Dahaim bin Wahq Al Murshidi Al Otaibi) नामक व्यक्ती चक्क पाचव्यांदा बोहल्यावर चढतो आहे. दुबई (Dubai) येथील अफिप प्रांतात (Afif province) तो विवाहबद्ध होतो आहे. त्याच्या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांतून जोरदार वृत्त झळकत आहे. तर नागरिकांध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी या व्यक्तीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी त्याच्यावर प्रचंड टीका केली आहे. सोशल मीडियावर हा व्यक्ती भलताच ट्रोल होऊ लागला आहे.

मजेशीर असे की, 90 वर्षांचा हा उत्साही नवरदेव प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देतो आहे. बीया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, उत्साही नासेर बिन दाहैम बिन वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी याने इस्लामच्या तत्त्वांचे पालन करणे आणि सहवास वाढवणे याच्या महत्त्वावर जोर दिला. सुन्नत म्हणून विवाहावर खोलवर रुजलेला विश्वास व्यक्त केला. हसत हसत तो म्हणाला, “मला पुन्हा लग्न करायचं आहे! विवाहित जीवन हे सर्वशक्तिमान, जगाचा प्रभू यांच्यासमोर विश्वासाचे आणि अभिमानाचे स्रोत आहे. वैवहीक जीवन सांसारिक समृद्धी आणते आणि तेच माझ्या चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे. जे तरुण-तरुणी विवाह करण्यास कचरतात, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ते (विवाह) स्वीकारावे.

वयाची पर्वा न करता विवाहाच्या फायद्यांवर आणि त्यातून मिळणारा आनंद यावर विश्वास व्यक्त करण्यास अल ओतैबीने अजिबात संकोच केला नाही. “मी माझ्या हनीमूनवर आनंदी आहे. लग्न म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुख आहे. म्हातारपण लग्नाला प्रतिबंध करत नाही.”

व्हिडिओ

चार जिवंत आणि एका मृत मुलाचे वडील अल ओतैबी त्याच्या विस्तारित कुटुंबाबद्दल प्रसारमाध्यमांशी प्रेमाने बोलले. माझ्या मुलांना आता मुलं आहेत आणि मला अजूनही मुलं व्हायची आहेत, असे मिश्कीलपणे सांगितले. सोशल मीडियावर एका युजरने त्यांच्या नातवाने “माझ्या आजोबांचे या लग्नासाठी अभिनंदन, तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा” असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now