Nova Kakhovka Dam Collapse: युक्रेनला मोठा धोका, 'नोव्हा काखोव्का' धरण फुटल्याने आला मोठा पुर; मोठ्या प्रमाणात नुकसान (Watch Video)

धरण फुटल्याने परिसरात पूर आला आहे. यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nova Kakhovka Dam Collapse | Photo: Twitter

युक्रेनला सर्वनाश होण्याचा धोका आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध युक्रेनसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचे कारण बनले आहे. दक्षिण युक्रेनमधील काखोव्का जलविद्युत प्रकल्पातील धरण (Nova Kakhovka Dam Collapse) फुटले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर या हल्ल्याचे आरोप केले आहेत. बंधारा फुटल्याने युद्धक्षेत्रात पुराचे पाणी पसरले आहे. दक्षिण युक्रेनमधील सर्वात मोठे नोव्हा काखोव्का धरण रशियन सैन्याने उडवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. धरण फुटल्याने परिसरात पूर आला आहे. यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (हे देखील वाचा: North Star Mall Shooting Video: सॅन अँटोनियोमधील नॉर्थ स्टार मॉलमध्ये गोळीबार; न्हावीच्या दुकानात केस कापणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, Watch Video)

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी तेथील रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या लष्करी गुप्तचरांनी रशियन सैन्याने नोव्हा काखोव्का धरण उडवल्याचा आरोप केला, तर क्रेमलिनने ते नाकारले आणि नुकसानीसाठी युक्रेनियन तोडफोडीला जबाबदार धरले.

पहा व्हिडिओ

दोन्ही देशांनी एकमेकांवर केले आरोप

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांवर धरण नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. हे धरण सध्या रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या दक्षिण युक्रेनमध्ये आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की धरण कोसळल्याने हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

धरण फुटल्यानंतर सखल भागात तीव्र पूर येऊ शकतो आणि युक्रेनचा बहुतांश भाग उद्ध्वस्त होऊ शकतो. या संदर्भात इशारा देण्यात आला आहे की, धरण कोसळल्यानंतर आता युक्रेनच्या हजारो लोकांना वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. धरण कोसळल्यानंतर डनिप्रो नदी परिसरातील रहिवाशांना हा परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.