उत्तर कोरियन हुकूमशहा Kim Jong Un जिवंत व ठणठणीत; किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या वृत्तावर वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांचे स्पष्टीकरण
उत्तर कोरियन (South Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) अचानक गायब झाल्यानंतर, त्याचे गंभीर आजारामुळे अथवा हृदयविकाराच्या अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर निधन झाल्याचे बातम्या समोर येत होत्या.
उत्तर कोरियन (South Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) अचानक गायब झाल्यानंतर, त्याचे गंभीर आजारामुळे अथवा हृदयविकाराच्या अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर निधन झाल्याचे बातम्या समोर येत होत्या. मात्र आता दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन (Moon Jae-in) यांच्या वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन पूर्णपणे जिवंत आणि निरोगी आहेत. किम त्यांच्या आजोबांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते त्यानंतर ते गायब झाले व त्यांच्या तब्येती बद्दल तर्क वितर्क लावले गेले. मात्र आता ते ठीक ठाक असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा विषयी मूनचे विशेष सल्लागार मून चुंग-इन यांनी रविवारी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आमच्या सरकारची स्थिती स्थिर आहे. किम जोंग-उन जिवंत आणि पूर्णपणे ठीक आहेत. किम 13 एप्रिलपासून वॉनसनमध्ये राहत आहेत, जे देशाच्या पूर्वेस एक रिसॉर्ट शहर आहे. तसेच किम यांच्या तब्येतीबाबत आतापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट समोर आली नाही.' किम जोंग उन 15 एप्रिल रोजी आजोबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली गेली होती. चार दिवसांपूर्वी ते एका सरकारी बैठकीत दिसले होते.
(हेही वाचा: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याच्या प्रकृतीवर संशय कायम, चीनने पाठवली तज्ञ डॉक्टरांची टीम)
या आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकन मीडियाने असे म्हटले होते की, नॉर्थ कोरियन लीडर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या हृदयशस्त्रक्रिया होणार आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेनंतर किम जोंग यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती अमेरिकेला सुत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी किम यांचे निधन झाले असल्याचा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला होता.मात्र सोशल मीडियात जो फोटो व्हायरल करण्यात आला, तो किम जोंग उन यांच्या वडिलांचा फोटो असल्याचे उघडकीस आले.