Korean War Anniversary: किम जोंग उन यांच्या आदेशाने शत्रूंचा संपूर्ण नाश करणार- उत्तर कोरिया लष्कर
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत किम जोंग उन उपस्थित एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हे विधान केले. या वेळी अधिकाऱ्यांनी किम जोंग उनच्या आदेशानुसार "शत्रूवर कधीही आणि विलंब न करता जबरदस्त हल्ला" करण्यासाठी त्यांची युद्ध क्षमता वाढवण्याचे वचन दिले.
उत्तर कोरियाने (North Korea) जाहीर केले आहे की नेता किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी आदेश दिल्यास ते आपल्या शत्रूंचा “संपूर्णपणे नाश” (Total Destruction) करतील. उत्तर कोरियाची राज्य माध्यम केसीएनए (KCNA) ने रविवारी ही माहिती दिली. कोरियन युद्ध शस्त्रसंधीचा 71 वा वर्धापन दिन शनिवारी (27 जुलै) साजरा झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत किम जोंग उन उपस्थित एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हे विधान केले. या बैठकीदरम्यान लष्कराचे कर्नल री उन र्योंग (Ri Un Ryong) आणि नौदलाचे लेफ्टनंट कमांडर यू क्योंग सॉन्ग (Yu Kyong Song) यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्याबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. या वेळी त्यांनी किम जोंग उनच्या आदेशानुसार "शत्रूवर कधीही आणि विलंब न करता जबरदस्त हल्ला" करण्यासाठी त्यांची युद्ध क्षमता वाढवण्याचे वचन दिले.
लष्करी वचनबद्धतेचा पुनरुच्चार
उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी अलीकडेच म्हटले आहे की, उत्तर कोरिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत आणि 2019 पासून तणाव कमी करण्याचे आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याचे प्रयत्न थांबले आहेत. तसेच, अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षांची पर्वा न करता संबंधांमध्ये कोणत्याही बदलाची अपेक्षा नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी यूएस आणि दक्षिण कोरियावर "अण्वस्त्र युद्धाला चिथावणी देण्यास तयार असल्याचा" आरोप केला आणि लष्करी तयारीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या बैठकीसाठी किम जोंग उन उपस्थित होते. (हेही वाचा, Vladimir Putin And Kim Jong Un Car Incident: आगोदर कोण? व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांच्या भेटीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, (Watch Video))
27 जुलै "विजय दिवस"
कोरियन युद्धातील शत्रुत्व संपवणाऱ्या युद्धविराम करारावर 27 जुलै 1953 रोजी उत्तर कोरिया, अमेरिका आणि चीन यांनी स्वाक्षरी केली होती. दक्षिण कोरियाला पाठिंबा देणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याच्या वतीने यूएस जनरल्सनी करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून उत्तर कोरिया 27 जुलै हा "विजय दिवस" म्हणून साजरा करत असताना, दक्षिण कोरिया हा दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांसह विशेष साजरा करत नाही. कराराने हा संघर्ष संपुष्टात आला असे वरवर वाटत असले तरी ते तसे नाही. दोन्ही कोरिया अजूनही तांत्रिकदृष्ट्या युद्धात आहेत. (हेही वाचा, Robot 'Commits Suicide': जगात पहिल्यांदाच दक्षिण कोरियामध्ये चक्क एका रोबोटने केली आत्महत्या; कामाच्या ताणाने त्रस्त असल्याचा दावा)
आतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक सांगतात, उत्तर कोरिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये राजनैतिक संबंधांचा अभाव आहे. सन 2019 पासून तणाव कमी करण्याचे आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याचे प्रयत्न ठप्प आहेत. उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी अलीकडेच सूचित केले आहे की, युनायटेड स्टेट्स च्या पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे याकडे दुर्लक्ष करून ते कोणत्याही बदलांची अपेक्षा करत नाहीत.