Nobel Prize in Chemistry 2020: यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार Emmanuelle Charpentier आणि Jennifer A. Doudna यांना Genome Editing साठी जाहीर
जर्मन - फ्रेंच शास्त्रज्ञ Emmanuelle Charpentier आणि अमेरिकेच्या Jennifer A. Doudna यांना Development of a method for Genome Editing साठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Nobel Prize in Chemistry 2020 Winners: आज (7 ऑक्टोबर) यंदाच्या रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा मानाचा पुरस्कार जर्मन - फ्रेंच शास्त्रज्ञ Emmanuelle Charpentier आणि अमेरिकेच्या Jennifer A. Doudna यांना Development of a method for Genome Editing साठी जाहीर झाला आहे. काही वेळापूर्वीच ‘स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या पॅनल कडून ही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मागील दोन दिवसांत वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कांची घोषणा करण्यात आली आहे. Nobel Prize for Medicine 2020: Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice यांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर.
दरम्यान दोन्ही मानकरर्यांनी मिळून 'CRISPR/Cas9 genetic scissors'ची निर्मिती केली आहे. हे एक असं टूल आहे ज्याचा वापर करुन प्राणी, प्लान्ट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्या DNA मध्ये प्रभावी बदल करता येऊ शकतात. त्याचा लाईफ़ सायंसवर मोठा प्रभाव आहे. यामुळे कॅन्सर सारख्या आजारांमध्ये नव्या थेरपींसाठी वापर करता येऊ शकतो. त्यामुळे या जीवघेण्या आजारातून अनेकांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न करता येईल.
नोबेल प्राईज ट्वीट
सध्या Charpentier या बर्लिन मध्ये Max Planck Unit for the Science of Pathogens च्या डिरेक्टर म्हणून काम करतात तर Doudna या University of California, Berkeley च्या प्राध्यापिका आणि Howard Hughes Medical Institute मध्ये investigator म्हणून काम करतात.
आत्तापर्यंत एकूण 111 वेळेस रसायन शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत. तर एकूण 183 जणांनी या पुरस्कारांच्या यादीमध्ये आपलं नावं मिळवलं आहे. 1901 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराच्या इतिहासामध्ये दरम्यानची 8 वर्ष अशी होती जेव्हा हा पुरस्कार कोणालाच जाहीर करण्यात आला नव्हता. 63 विजेत्यांनी हा पुरस्कार एकट्याने जिंकला आहे तर 23 वेळेस हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 25 वेळेस या पुरस्काराचे 3 विजेते होते.
नोबेल पुरस्कार विजेत्याला सुवर्ण पदक, 10 मिलियन Swedish kronor ची रक्कम म्हणजेच अंदाजे 1,118,000 अमेरिकन डॉलर मिळतात. मेडिसन सोबतच फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमेस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर केले जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)