New Zealand MP Performs Haka Dance In Parliament: न्यूझीलंडच्या खासदार हाना रावहितीने सभागृहात केला 'हाका डान्स'; विधेयकाची प्रतही फाडली (Watch Video)
हाना रावहिती यांनी संसदेत हाका नृत्य (Haka Dance) करत स्वदेशी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर इतर लोकही त्यात सामील झाले. हाना रावहिती या न्यूझीलंडच्या संसदेतील सर्वात तरुण खासदार आहेत.
New Zealand MP Performs Haka Dance In Parliament: संसदेत विधेयक फाडून न्यूझीलंडच्या खासदार हाना रावहिती (Hana Rawhiti) मापी क्लार्क पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गुरुवारी न्यूझीलंडच्या संसदेत (New Zealand Parliament) हाना यांचे रौद्र रुप पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हाना रावहिती यांनी संसदेत हाका नृत्य (Haka Dance) करत स्वदेशी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर इतर लोकही त्यात सामील झाले. हाना रावहिती या न्यूझीलंडच्या संसदेतील सर्वात तरुण खासदार आहेत.
हाना राविती यांनी संसदेत सादर केले हाका नृत्य -
प्राप्त माहितीनुसार, न्यूझीलंडचे खासदार तत्त्व विधेयकावर मतदान करण्यासाठी संसदेत जमले होते. यादरम्यान 22 वर्षीय हाना रावहिती यांनी विधेयकाची प्रत फाडून सभागृहात पारंपरिक हाका नृत्य सादर केले. हाना रावहितीने नृत्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच सभागृहातील इतर सदस्य आणि गॅलरीत बसलेले प्रेक्षकही हाका नृत्यात सामील झाले. त्यामुळे सभापती गेरी ब्राउनली यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले. (हेही वाचा - Japan Population Crisis: 'महिलांनी 25 वर्षांपर्यंत करावे लग्न आणि 30 व्या वर्षी काढून टाकावे गर्भाशय'; जपानमधील लोकसंख्या संकटावर नेते Naoki Hyakuta यांचा अजब सल्ला)
हाना रावहिती यांनी कोणते विधेयक फाडले?
सरकार आणि माओरी यांच्यातील संबंधांचे मार्गदर्शन करणाऱ्या 1840 च्या वैतांगीच्या करारात ठरविलेल्या तत्त्वांनुसार, आदिवासींना त्यांच्या जमिनी राखून ठेवण्याचे आणि ब्रिटिशांना राज्य देण्याच्या बदल्यात त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते. ते अधिकार सर्व न्यूझीलंडवासियांना लागू झाले पाहिजेत, असे बिलाने नमूद केले होते. (हेही वाचा - Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून)
कोण आहेत हाना रावहिती?
न्यूझीलंडच्या 170 वर्षांच्या इतिहासात सर्वात तरुण खासदार ठरलेल्या हाना रावहिती, मापी क्लार्क यांचे संसदेत माओरी भाषेतील भाषण जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. न्यूझीलंडमधील आओटेरोआ येथून निवडून आलेल्या हाना 1853 नंतर पहिल्यांदाच सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. हाना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्या संसदेत निवडून आल्या होत्या. ननय्या माहुता यांचा पराभव करून त्यांनी ही निवडणूक जिंकली. 2008 पासून ननय्या यांनी ही जागा सांभाळली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)