New York: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी Trump Organization चौकशीच्या फेऱ्यात
या संस्थांनी आर्थिक लाभासाठी कर्ज आणि मालमत्ता करांमध्ये मोठी सवलत मिळवल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले अमेरिकेचे माजी राष्ट्राधयक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गोत्यात आले आहेत. न्यूयॉर्क (New York) राज्याच्या अटर्नी जरलनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांची चौकशी करण्याबात आदेश दिले आहेत. ट्रम्प संस्थांवर (Trump Organization) आर्थिक अफरातफर आणि गुन्ह्यांचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा एक कायदेशीर धोका असल्याचे मानले जात आहे. न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल Letitia James हे ट्रम्प यांच्या संस्थाची चौकशी करत आहेत. या संस्थांनी आर्थिक लाभासाठी कर्ज आणि मालमत्ता करांमध्ये मोठी सवलत मिळवल्याचे बोलले जात आहे.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर संकटांनी वाढ केली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या या अध्यक्षांवर दाखल झालेल्या ज्ञात आर्थिक गुन्ह्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्ताचा दाखला देत आयएनएसने म्हटले आहे की, न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने 2019 मध्ये ट्रम्प ऑर्गनायजेशनची एक सव्हिल चौकशी सुरु केली होती. ही चौकशी संपत्ती, संपत्तीचे मूल्यमापन कर्ज आणि विमा कव्हर प्राप्त करण्यासाठी वाढविण्यात आले होते. कर वाचविण्यासाठी असे करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत म्हटले आहे. (हेही वाचा, Donald Trump यांची पुन्हा होणार Social Media वर वापसी; सुरु करू शकतात स्वतःचे नवे व्यासपीठ- Ex-Aide)
मैनहट्टन जिल्ह्यातील अॅटर्नी जनरल कार्यालयाने 2016 च्या राष्ट्रपती मोहिमेत विश्वासघात आणि करचोरी आदींशी संबंधित 2018 पासून चौकशी सुरु आहे. कोणतीही औपचारीक माहिती न देता डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने बुधवारी ट्विट केले की, न्यूयॉर्क अॅटर्नी जनरल कार्यालय एक राजकीय शस्त्र म्हणून वापरले जात आहे. अशा पद्धतीने एक धोकादायक पायंडा पाडला जात आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्रम्प ऑर्गेनायजेशनचे संस्थापक आहेत. त्यांच्या दोन पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअर आणि एरिक ट्रम्प आता कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतात.