श्रीराम नेपाळी असुन खरी अयोध्या सुद्धा नेपाळ मध्येच आहे सांगणार्या पंतप्रधान के. पी शर्मा ओली यांच्या विधानावर नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
शर्मा ओली (Nepal PM K.P. Sharma Oli) यांनी काल भारताने नेपाळ वर सांस्कृतिक अतिक्रमण करत स्वतःच्या देशात खोटी अयोध्या (Ayodhya) स्थापन केल्याचा दावा केला होता, इतकंच काय तर प्रभू श्री राम (Shree Ram) हे सुद्धा नेपाळीच आहे भारतीय नाही असेही ओली यांनी म्हंटले होते यावर नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
नेपाळ चे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली (Nepal PM K.P. Sharma Oli) यांनी काल भारताने नेपाळ वर सांस्कृतिक अतिक्रमण करत स्वतःच्या देशात खोटी अयोध्या (Ayodhya) स्थापन केल्याचा दावा केला होता, इतकंच काय तर प्रभू श्री राम (Shree Ram) हे सुद्धा नेपाळीच आहे भारतीय नाही असेही ओली यांनी म्हंटले होते, मात्र या विधानावरून गोत्यात येत असल्याचे पाहता ओली यांच्या या विधानावरून नेपाळने घुमजाव केल्याचे दिसत आहे, नेपाळ च्या परराष्ट्र मंत्रालयाने (Nepal Foreign Affairs Ministry) या संदर्भात एक स्पष्टीकरण देणारे पत्रक जारी केले असून त्यात पंतप्रधानांचा कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नव्हता असं सांगण्यात आलं आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान के.पी. ओली यांच्या अयोध्या आणि भगवान राम यांच्यावरील टीकेविषयी स्पष्टीकरण जारी केले. ज्यात त्यांनी म्हंटले की "पंतप्रधान ओली यांनी केलेल्या विधानाचा कोणत्याही राजकीय विषयाशी निगडित टीका करणे, कोणाच्याही भावना दुखावणे, अयोध्याचे सांस्कृतिक महत्त्व कमी करणे हा हेतू नाही. श्री राम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांबद्दल अनेक पुरावे व संदर्भ सापडले असल्याने पुढील अभ्यासांचे महत्त्व तसेच रामायणात मांडलेल्या सांस्कृतिक भौगोलिक संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केपी शर्मा ओली यांनी हे विधान केले होते.
ANI ट्विट
काल 207 व्या भानुभक्त जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी मदन भंडारी कला साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ओली यांनी या संदर्भात विधान केले होते, ‘नेपाळमधील बिरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांचे साम्राज्य असून, भारताने वादग्रस्त अयोध्याची स्थापना केली होती. भगवान राम हे मुळचे नेपाळी आहेत, भारतीय नाही.’ असे ओली यांचे विधान होते. यापूर्वी सुद्धा भारताची जागा नेपाळच्या नकाशात जोडून, चीन च्या पावलावर पाऊल टाकून नेपाळने भारताला हुलकावण्या दिल्या आहेत यावर भारताकडून अद्याप काहीही उत्तर देण्यात आलेले नाही.