Nepal Earthquake: नेपाळ मध्ये 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का, 6 जण दगावले; दिल्ली देखील हादरली

यामध्ये काही घरं कोसळली आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे.

Nepal | PC: Twitter/ANI

नेपाळ (Nepal) मध्ये आज (9 नोव्हेंबर) सकाळी भूकंपाचा धक्का (Earthquake) बसला आहे. यामध्ये 6 जण दगावले आहेत. काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्याचे हादरे भारतामध्ये मणिपूर ते दिल्ली (Delhi) पर्यंत जाणवले आहेत. भारतामध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. हा भूकंप नेपाळची स्थानिक वेळ रात्री 2 वाजून 12 मिनिटांनी झाला होता.

नेपाळमध्ये डोटी (Doti) भागात भूकंपामध्ये काही ठिकाणी लॅन्डस्लाईड झाले आहे. यामध्ये काही घरं कोसळली आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. भारतामध्ये दिल्लीत रात्री 2 च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. National Centre for Seismology च्या माहितीनुसार, मागील 24 तासांत दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी देखील सकाळी 4.5 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला होता.

नेपाळच्या पंतप्रधानांकडून या दुर्घटनेबाबत शोक व्यक करण्यात आला आहे.  Khaptad भागामध्ये झालेल्या या भूकंपामध्ये जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ट्वीटर वरून सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Baba Vanga 2022 Predictions: बाबा वंगा यांच्या 2022 साठीच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भविष्यवाण्या; होणार नवीन विषाणूचा उद्रेक, येणार अनेक नैसर्गिक आपत्त्या .

पहा ट्वीट

नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंप 1934 साली जाणवला आहे. 8 रिश्टल स्केलच्या भूकंपामध्ये काठमांडू, भक्तापूर, पाटण ही शहरं उद्धवस्त झाली होती.