Myanmar : म्यानमारमध्ये पारंपरिक नववर्षाच्या सुरूवातीची अनोखी प्रथा; 3,000 हून अधिक कैद्यांना दिली शिक्षेतून माफी
म्यानमारच्या राज्य प्रशासन परिषदेने पारंपारिक म्यानमार नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 17 मार्च 2024 रोजी 3,000 हून अधिक कैद्यांना माफ केले आहे.
Myanmar : म्यानमारच्या राज्य प्रशासन परिषद (State Administration Council)ने पारंपारिक म्यानमार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 17 मार्च 2024 रोजी 3,000 हून अधिक कैद्यांना माफ केले आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालाचा हवाला देत सांगण्यात आले आहे की, एकूण कैद्यांपैकी 3,303 म्यानमारचे नागरिक आहेत. 36 विदेशी कैदी आहेत. ज्यामध्ये 13 इंडोनेशियन नागरिक आणि 15 श्रीलंकेचे नागरिक आहेत. (हेही वाचा:Uttar Pradesh News: अंगावर उकळतं पाणी ओतलं, बेदम मारहाण केली; उत्तर प्रदेशमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या संशयावून जावयाचा छळ )
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालाचा असेही म्हटले आहे की म्यानमारच्या पारंपारिक नवीन वर्षाच्या दिवशी अनेकांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली. ज्यामुळे म्यानमारच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दिवशी कैद्यांना माफ करण्याची म्यानमारमध्ये जूनी प्रथा आहे. गेल्या वर्षी, म्यानमारच्या पारंपारिक नवीन वर्षाच्या दिवशी 3,000 कैद्यांची सुटका करण्यात आली होती.