Mob Demolishes Hindu Temple in Pakistan: हिंदू मंदिर पाडले प्रकरणी पाकिस्तानात 31 जणांना अटक, मौलानाने उसकवल्याचा आरोप

रहमत यांना तख्त-ए-नुसरती तहसील येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

Hindu Temple Destroyed in Pakistan | (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानातील (Pakistan) कारक जिल्ह्यात ऐतिहासिक हिंदू मंदिर जमावाने जमिनदोस्त ( Mob Demolishes Hindu Temple in Pakistan) केले. या प्रकरणात पाकिस्तान पोलिसांनी 31 जणांना अटक केली आहे. या जमावाला एका मौलानाने उसकावले. जे लोक हे मंदिर पाडतील ते शहीद होतील असे या मौलानाने जमावाला सांगितले होते असा आरोप आहे. या मौलानासोबत जमीयत उलेमा ए इस्लाम फजल संघटनेच्या एका स्थानिक नेत्यानेही जमााला उसकावल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींना गुरुवारी (31 डिसेंबर 2020) अटक केली आहे. मंदिर पाडण्याची घटनाखैबर पख्तूनख्वाह (Khyber Pakhtunkhwa) प्रांतात (बुधवारी, 30 डिसेंबर 2020) या दिवशी घडली होती. येथे जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जमावाने हिंदू मंदिराला आग लावली आणि ते जमिनदोस्त केले. (हेही वाचा, Mob Demolishes Hindu Temple in Pakistan: पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक मंदिरावर हल्ला, 14 जणांना अटक; खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील घटना)

पाकिस्तानातील पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात 'द डॉन'ने म्हटले आहे की, JUI-F चे ज्येष्ठ नेते रेहमत सलाम खट्टक यांनाही अटक करण्यात आली आहे. रहमत यांना तख्त-ए-नुसरती तहसील येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मंदिर पाडल्या प्रकरणी अद्यापही छापेमारी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक लोक भूमिगत झाले आहेत. पोलिासंनी आतापर्यंत धार्मिक भावनांना इजा पोहोचवणे, चौरी, सरकारी कामात अडथळा, यांसारख्या विविध आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत.



संबंधित बातम्या