Indian Student Found Dead In London River: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीतआढळला
मितकुमार पटेल (Mitkumar Patel Found Dead) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पाठिमागील महिन्यापासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा (Missing Indian Student) मृतदेह लंडन (London) येथील थेम्स नदीत (Thames River) आढळून आला आहे. मितकुमार पटेल (Mitkumar Patel Found Dead) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी तो यूकेमध्ये आला होता. त्याच्याशी संपर्क न होऊ शकल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार 17 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. दरम्यान, मेट्रोपॉलिटन पोलिसांना त्याचा मृतदेह पूर्व लंडनच्या कॅनरी वार्फ परिसरात थेम्स नदीत आढळून आला. त्याची वैद्यकीत तपासणी केल्यानंतर पॅरामेडिक्सने त्याला मृत घोषीत केले.
मृत्यू संशयास्पद नाही- पोलीस
मितकूमार याचा मृत्यून नैसर्गिकपणे झाला असावा. त्याच्या मृत्यूपाठिमागे संशयास्पद असे काहीही आढळून आले नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, मितकुमार पटेल याचा नातेवाईक असलेल्या पर्थ पटेल यांनी 'गो फंड मी' ऑनलाइन फंडरेझर सुरु केला आहे. ज्याला प्रतिसाद मिळत असून आठवडाभरापासून GBP 4,500 पेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे त्याने म्हटले आहे. हा फंड गोळा करताना त्याने म्हटले आहे की, "मितकुमार पटेल हा 23 वर्षांचा (वय) मुलगा 19 सप्टेंबर 2023 रोजी उच्च शिक्षणासाठी यूकेला आला होता. ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे." (हेही वाचा, Indian Student killed in Accident At Canada: कॅनडामध्ये ट्रकने सायकलला धडक दिल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू)
मितकूमार पटेल शेतकरी कुटुंबातील मुलगा
पार्थ पटेल यांनी मितकूमार याच्यासंदर्भात अधिक माहिती देताना म्हटले आहे की, 'तो एक शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. भारतामधील एका दुर्गम खेड्यातून तो शिक्षणासाठी इतक्या दूर आला होता. महनाभरापासून तो पासून बेपत्ता होता. तब्बल एक महिन्यांनंतर म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह कॅनरी वार्फमधून येथे पाण्यात आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांना मदत म्हणून आम्ही मदतनिधी जमा करत आहोत. ज्यामुळे त्याचा मृतदेह भारतात त्याच्या मूळ गावी पाठवता येईल आणि त्याच्या कुटंबाला काही मदही मिळेल'. 'इव्हनिंग स्टँडर्ड' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सदर विद्यार्थ्याला 20 नोव्हेंबर रोजी शेफील्ड हलम विद्यापीठात पदवी आणि अॅमेझॉनमध्ये अर्धवेळ नोकरी सुरू करण्यासाठी शेफिल्डला जायचे होते. तत्पूर्वीच त्याचा करुन अंत झाला.
थेम्स नदी ही, दक्षिण इंग्लंडची एक प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. तिचे खोरे अंदाजे 5,500 चौरस मैल (14,250 चौरस किमी) इतके क्षेत्र व्यापते आणि ती समुद्रसपाटीपासून 356 फूट (108.5 मीटर) इतकी उंच आहे. सिरेन्सेस्टर शहराच्या नैऋत्येस 3 मैल (5 किमी) अतरावर या नदीचा प्रवाह आढळतो.