Miss Universe 2019: दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती Zozibini Tunzi ने पटकावला ‘मिस युनिव्हर्स 2019’ चा किताब
जोजिबिनी ही मुळची दक्षिण आफ्रिकेतील त्सोलो येथील रहिवासी आहे. अटलांटा येथे पार पडलेल्या स्पर्धेत जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. ‘मिस युनिव्हर्स’ किताब आपल्या नावावर करणारी जोजिबिनी 26 वर्षाची आहे.
Miss Universe 2019: जॉर्जियातील अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने आपले नाव कोरले आहे. जोजिबिनी ही मुळची दक्षिण आफ्रिकेतील त्सोलो येथील रहिवासी आहे. अटलांटा येथे पार पडलेल्या स्पर्धेत जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. ‘मिस युनिव्हर्स’ किताब आपल्या नावावर करणारी जोजिबिनी 26 वर्षाची आहे.
जोजिबिनीने 'स्वीमसुट' आणि 'गाऊन' अशा दोन फेऱ्यांनंतर परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरं दिली. त्यानंतर तिची निवड करण्यात आली. जोजिबिनीने पुरस्कार स्विकारल्यानंतर सांगितले की, 'मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु, सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.'
या स्पर्धेत मिस मेक्सिको आणि मिस प्युर्तो रितो यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. (हेही वाचा - अबब! अमेरिकेत एक केळ विकले 85 लाखाला; फोटो होतोय व्हायरल)
दरम्यान, मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, जोजिबिनीचा लिंगभेद, हिंसाचार यांच्याविरोधात लढा देण्याऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग असतो. या स्पर्धेत भारताच्या वाट्याला अपयश आलं आहे. या स्पर्धेत भारताकडून सहभागी झालेल्या वर्तिका सिंह हिला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही.