Methane Gas Leak At Iran Coal Mine: इराणमध्ये कोळशाच्या खाणीत मिथेन वायूची गळती; 51 ठार, 20 हून अधिक जखमी
इराणच्या दक्षिण खोरासान प्रांतातील कोळशाच्या खाणीत झालेल्या गॅसच्या स्फोटात किमान 51 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.
Methane Gas Leak At Iran Coal Mine: इराण (Iran) च्या दक्षिण खोरासान प्रांतातील कोळशाच्या खाणीत (Coal Mine) झालेल्या गॅसच्या स्फोटात किमान 51 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. इराणच्या राज्य माध्यमांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. मदनजू कंपनी (Madanjoo Company) द्वारे चालवल्या जाणाऱ्या खाणीच्या बी आणि सी या दोन ब्लॉकमध्ये मिथेन वायू (Methane Gas) च्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली.
दक्षिण खोरासान प्रांताचे गव्हर्नर अली अकबर रहीमी यांनी सांगितले की, इराणमध्ये 76% कोळसा या प्रदेशातून पुरविला जातो. मदनजू कंपनीसह सुमारे 8 ते 10 मोठ्या कंपन्या या प्रदेशात काम करत आहेत. इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले की, त्यांनी अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Gas Leak in Pune: पिंपरी चिंचवड येथे गॅस गळतीमुळे स्फोट, 5 जण जखमी, पाहा व्हिडीओ)
तेल-उत्पादक इराण विविध प्रकारच्या खनिजांनी समृद्ध आहे. इराणला दरवर्षी सुमारे 3.5 दशलक्ष टन कोळसा लागतो. देशातून दरवर्षी केवळ 1.8 दशलक्ष टन कोळसा काढला जातो. उर्वरित गरज भागवण्यासाठी कोळसा इतर देशातून आयात केला जातो. (हेही वाचा - Ambernath Gas Leak: अंबरनाथमध्ये गॅस गळती; नागरिकांना डोळ्यांची जळजळ अन् श्वास घ्यायला त्रास, परिसरात भितीचे वातावरण)
इराणच्या खाण उद्योगातील ही पहिलीचं दुर्घटना नाही. यापूर्वी 2013 मध्ये दोन वेगवेगळ्या खाण घटनांमध्ये 11 कामगारांचा मृत्यू झाला होता. 2009 मध्ये अनेक घटनांमध्ये 20 कामगारांचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 42 जणांचा मृत्यू झाला होता.