 
                                                                 Melinda Gates Resigns: मायक्रोसॉफ्ट ( Microsoft)चे संस्थापक बिल गेट्स(Bill Gates) यांच्या पत्नी आणि माजी सीईओ मेलिंडा फ्रेंच गेट्स(Melinda Gates) यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन( Bill and Melinda Gates Foundation)मधील सह-अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 7 जून 2024 हा त्यांचा संस्थेतील शेवटचा दिवस असेल असे त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. जारी केलेल्या निवेदनात त्यांनी संस्थेशी जोडलेल्या त्यांचा एकूण प्रवासाविषयी भावना व्यक्त केल्या. फाउंडेशन सोबत जोडल्या गेल्याचा खूप अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.(हेही वाचा:Microsoft Lay Offs: मायक्रोसॉफ्टमध्ये होणार नोकर कपात; ऍक्टिव्हिजन ब्लिझार्डसह गेमिंग विभागातील 1,900 लोकांना कामावरून काढले जाणार )
जारी केलेल्या एरा पत्रकात त्या म्हणाल्या की, 'या फाउंडेशनचा खूप अभिमान आहे. तसचे फाउंडेशनसोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक कर्मचारी, भागीदाराची मला काळजी आहे. मार्क सुझमन यांच्या नेतृत्वात पाया मजबूत होईल या विचाराने पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनच्या टीमकडून असेच काम चालू राहील याची खात्री आहे.' असे त्या म्हणाल्या.
बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा यांचे सुरुवातीपासूनच बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानले. बिल गेट्स म्हणाले, 'मेलिंडा निघून गेल्याचे पाहून मला वाईट वाटते, परंतु मला खात्री आहे की तिच्या भविष्यातील कार्यात तिचा मोठा प्रभाव पडेल.' त्यांनी पुढे सांगितले की 'मेलिंडा यांनी संस्थेची धोरणे आणि उपक्रमांना आकार देण्यास मदत केली आणि जागतिक आरोग्य आणि लैंगिक समानतेवर परिणामकारक बदल आणला.
— Melinda French Gates (@melindagates) May 13, 2024
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
