Medical Negligence: केमोथेरपीनंतर महिलेचे संपूर्ण केस गळाले, त्वचाही खराब झाली; त्यानंतर डॉक्टरांचा खुलासा- तिला कर्करोग झालाच नव्हता

न्यूयॉर्क पोस्टनुसार, दोन मुलांची आई लिसा मोंक (Lisa Monk) ला पोटदुखीची तक्रार होती. तिला किडनी स्टोन असल्याचा संशय होता. पोटदुखीची समस्या घेऊन लिसा एका हॉस्पीटलमध्ये पोहोचली. तिथे चाचण्या केल्या गेल्या आणि सर्व चाचण्यांमध्ये तिला किडनी स्टोनचा त्रास असल्याचे समोर आले.

File Image

अमेरिकेतील टेक्सासमध्ये  (Texas) एका हॉस्पिटलच्या मोठ्या चुकीमुळे दोन मुलांच्या आईला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान केले आणि तिला सांगितले गेले की तिच्याकडे फक्त 15 महिने शिल्लक आहेत. त्यानंतर तिला केमोथेरपी (Chemotherapy) दिली गेली. या प्रक्रियेमध्ये महिलेला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर महिलेला कधीच कॅन्सर झाला नसल्याचे समोर आले. नंतर रुग्णालयाने महिलेची माफी मागून तिला डिस्चार्ज दिला. महिला पोटदुखीच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचली होती.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, दोन मुलांची आई लिसा मोंक (Lisa Monk) ला पोटदुखीची तक्रार होती. तिला किडनी स्टोन असल्याचा संशय होता. पोटदुखीची समस्या घेऊन लिसा एका हॉस्पीटलमध्ये पोहोचली. तिथे चाचण्या केल्या गेल्या आणि सर्व चाचण्यांमध्ये तिला किडनी स्टोनचा त्रास असल्याचे समोर आले.

परंतु तपासणीनंतर डॉक्टरांना आणखी एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे कर्करोग. महिला ब्लड कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. लिसाला हे सांगताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती खूप घाबरली होती. तिने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या आजाराविषयी सांगितले. लिसाच्या म्हणण्यानुसार, तिला सांगण्यात आले होते की तिच्याकडे जगण्यासाठी फक्त 15 शिल्लक आहेत. त्यामुळे पराभव स्वीकारण्याऐवजी तिने लढण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले. या दरम्यान महिलेची केमोथेरपी झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला मार्च 2023 मध्ये केमोथेरपीच्या पहिल्या टप्प्याचा सामना करावा लागला. या काळात तिच्या शरीरात अनेक बदल झाले. आधी डोक्यावरचे सगळे केस गेले, उलट्या होऊ लागल्या. शरीर खूप अशक्त झाले. महिलेची त्वचा खूप पांढरी आणि कोरडी झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा केमोथेरपी झाली. त्यानंतर चेकअपसाठी ती रुग्णालयात पोहोचली तेव्हा रिपोर्ट्समध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना कळले की तिला कधीच कर्करोग झाला नव्हता. (हेही वाचा: Cancer Capital of The World: भारत बनला 'जगातील कॅन्सरची राजधानी'; कर्करोग प्रकरणांमध्ये होत आहे झपाट्याने वाढ, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

ही गोष्ट समोर आल्यानंतर महिला रुग्णालयावर प्रचंड संतापली. त्यांच्या निष्काळजीपणामुळे तिला इतका त्रास सहन करावा लागला. तिच्या डॉक्टरांनी तिला पहिला पॅथॉलॉजी रिपोर्ट चुकीचा असल्याचे सांगितले. महिलेच्या म्हणण्यानुसार, हा रिपोर्ट महिनाभरापूर्वीचा आहे, म्हणजे जेव्हा तिची केमोथेरपी सुरू होती, त्यावेळचा. या निष्काळजीपणाबद्दल महिलेने रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now