मॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती
साईभक्तांच्या सोयीसाठी मॉरिशस मध्ये गंगालेख (Gangalekh) याठिकाणी भव्य साई मंदीर (Saibaba Mandir) बांधण्याची योजना आखली आहे याबाबात मॉरिशसचे भूपरिवहन व रेल्वे मंत्री अॅलन गानू (Alan Ganoo) यांनी माहिती दिली.
मॉरिशस (Mauritius) देशात वास्तव्य करणाऱ्या 60 टक्के हिंदू धर्मिय वर्गात साईभक्तांची संख्या मोठी आहे. मात्र या भक्तांसाठी संपूर्ण देशात केवळ पाच ते सहा छोटी साई मंदिरे आहेत. परिणामी ही ,मंदिरे नेहमीच गर्दीची ठिकाणे ठरतात. ही बाब लक्षात घेता साईभक्तांच्या सोयीसाठी गंगालेख (Gangalekh) याठिकाणी मॉरिशस सरकारने भव्य साई मंदीर (Saibaba Mandir) बांधण्याची योजना आखली आहे याबाबात मॉरिशसचे भूपरिवहन व रेल्वे मंत्री अॅलन गानू (Alan Ganoo) यांनी माहिती दिली. अॅलन यांनी गुरुवारी शिर्डी (Shirdi) येथे भेट देत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यावेळीच बोलताना त्यांनी या योजनेची घोषणा केली.
प्राप्त माहितीनुसार, अॅलन हे स्वतः साईबाबांचे भक्त आहेत. यापूर्वी 1996 मध्ये पहिल्यांदा त्यांनी भारतात येऊन शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले होते. तर मागील वर्षी विरोधी पक्षात असताना निवडणुकांच्या वेळेस त्यांनी साईंचे दर्शन घेण्यासाठी भारत दौरा केला होता. "साईंच्या कृपेने मला नंतर मंत्रिपद मिळाले इतकेच नव्हे तर आयुष्यात अनेकदा साईबाबांमुळे दैवी चा,चमत्कार अनुभवायाला मिळाले आहेत" असेही अॅलन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
दरम्यान, शिर्डी साईबाबांची ख्याती देशविदेशात आहे, दरवर्षी कोट्यवधी भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात इतकेच नव्हे तर देशातील सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या मंदिरांमध्ये देखील शिर्डी संस्थांचे नाव आवर्जून घेतले जाते. जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणहून शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रांचे आयोजन केले जाते. भारतात या मंदिराची इतकी ख्याती असताना आता परदेशातही साईंचे मंदिर उभारले जाणे ही भक्तांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे म्हणायला हवे.