Steel Plant Explosion In Central Mexico: मेक्सिकोच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; 12 जणांचा मृत्यू, एक जखमी

याबाबतची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्लाक्सकाला स्टेट सिव्हिल प्रोटेक्शनने सांगितले की, मेक्सिको सिटीच्या पूर्वेला सुमारे 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऍक्लोझटोकमध्ये पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली.

Steel Plant Explosion In Central Mexico (फोटो सौजन्य - @ReutersWorld)

Steel Plant Explosion In Central Mexico: मेक्सिकोतील स्टील प्लांटमध्ये स्फोट (Steel Plant Explosion) झाल्याने भीषण आग (Fire) लागली. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्लाक्सकाला स्टेट सिव्हिल प्रोटेक्शनने सांगितले की, मेक्सिको सिटीच्या पूर्वेला सुमारे 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऍक्लोझटोकमध्ये पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे आणखी एक जण जखमी झाला आहे. मात्र त्याच्या प्रकृतीबाबत माहिती मिळू शकलेली नाही. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून तपास सुरू आहे. त्लाक्सकलाच्या गव्हर्नर लोरेना क्युलर यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. (हेही वाचा -Cylinder Blast In Navi Mumbai Ulwe: नवी मुंबईतील उलवे येथे सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जखमी)

सेंट्रल मेक्सिकोमध्ये स्टील प्लांटमध्ये स्फोट - 

आग आटोक्यात आणल्यानंतर बचाव आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चौकशी होईपर्यंत स्टील प्लांट बंद राहणार आहे. राज्य नागरी संरक्षण कार्यालयाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्मेल्टिंग उपकरणे कोसळल्याने हा स्फोट झाला असावा.