Victoria: Seychelles मध्ये Mahatma Gandhi आणि Nelson Mandela यांच्या पुतळ्याची तोडफोड; भारताकडून तीव्र निषेध

त्यांनी जगाला अहिंसक संघर्षासाठी प्रेरित केले आहे. हा पुतळा भारत आणि सेशेल्समधील ऐतिहासिक आणि सौहार्दपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे."

Mahatma Gandhi and Nelson Mandela (File Photo Credit: ANI/File Photo)

Victoria: सेशेल्स (Seychelles) ची राजधानी व्हिक्टोरिया (Victoria) च्या 'पीस पार्क'मध्ये असलेल्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांच्या पुतळ्यांच्या तोडफोडीचा भारतीय मिशनने तीव्र निषेध केला आहे. भारतीय मिशनने 6 जानेवारी रोजी एक निवेदन जारी करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

भारतीय मिशननुसार, जून 2022 रोजी व्हिक्टोरियाच्या 'पीस पार्क'मध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सेशेल्सचे संस्थापक अध्यक्ष सर जेम्स मॅचम आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले वर्णभेद विरोधी क्रांतिकारक आणि राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या शेजारी महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला होता. (हेही वाचा - World's Richest Pet: 800 कोटींची मालक आहे ही मांजर; जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत Olivia Benson चा लागतो तिसरा क्रमांक)

आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी -

आपल्या निवेदनात, भारतीय मिशनने म्हटले आहे की, "महात्मा गांधींचा मानवतेचा संदेश आणि वसाहतवादाविरुद्ध शांततापूर्ण संघर्ष प्रशंसनीय आहे. त्यांनी जगाला अहिंसक संघर्षासाठी प्रेरित केले आहे. हा पुतळा भारत आणि सेशेल्समधील ऐतिहासिक आणि सौहार्दपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे."

यापूर्वीही अनेक देशात भागातून महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सहा जणांनी मिळून न्युयॉर्क शहरातील महात्मा गांधींच्या हस्तकलेचा पुतळा फोडला होता. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये मॅनहॅटनजवळील युनियन स्क्वेअरमध्ये गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. या दोन्ही कृत्यांचा भारतीय मिशनने तीव्र निषेध केला. यानंतर भारतीय-अमेरिकन समुदायात निराशा पसरली होती.