Louis Vuitton's Next Heir: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Bernard Arnault लवकरच निवडणार उत्तराधिकारी; घेतली आपल्या पाचही मुलांची ऑडिशन
याआधी 19 एप्रिल रोजी त्यांची संपत्ती $208 अब्ज होती. Louis Vuitton Moët Hennessy हे जगातील लक्झरी उत्पादनांमधील सर्वात मोठे नाव आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, लुई व्हिटॉन मोएट हेनेसी (Louis Vuitton Moet Hennessy- LVMH) चे अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) हे आपले साम्राज्य पुढील पिढीकडे सोपवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. अहवालानुसार, ते आपल्या पाच मुलांना महिन्यातून एकदा दुपारच्या जेवणासाठी भेटतात आणि त्यांचा लक्झरी व्यवसाय कोण चालवण्यास सक्षम आहे हे ठरवण्यासाठी मुलांची ऑडिशन घेतात. नुकतेच बर्नार्ड यांनी आपले लक्झरी ब्रँडचे साम्राज्य पुढे चालवण्यासाठी त्यांच्या पाच मुलांची ऑडिशन घेतली आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट हे लुई व्हिटॉनच्या मुख्यालयात एका खाजगी जेवणाच्या खोलीत आपल्या पाच मुलांना भेटल्याचे सांगितले जाते. ही त्यांची लंचटाइम मीटिंग 90 मिनिटे चालली, ज्या दरम्यान या फ्रेंच अब्जाधीशाने आपले साम्राज्य चालवण्याच्या धोरणाबद्दल आपल्या मुलांना सल्ला विचारला. बर्नार्ड अर्नॉल्ट आपल्या पाच मुलांपैकी प्रत्येकाकडे गेले आणि त्यांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांचे असे मत आहे की, बर्नार्ड यांना एलव्हीएमएचच्या विविध व्यवस्थापकांबद्दल आपल्या मुलांचे मत हवे होते.
हे पाहता एलव्हीएमएच मध्ये बदल होणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या लंच दरम्यान, अर्नॉल्ट यांनी आपल्या लक्झरी साम्राज्याचे उत्तम व्यवस्थापन कोण करू शकते हे पाहण्यासाठी त्यांच्या मुलांची ऑडिशन घेतात. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की, या बैठकी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कंपनी चालवणाऱ्या त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेचा भाग आहेत. अर्नॉल्ट यांना निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर आपला उत्तराधिकारी निवडायचा आहे. अर्नॉल्ट यांच्या मुलांना याआधीच कंपनीत महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांना मागे टाकत अर्नॉल्ट गेल्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. याआधी 19 एप्रिल रोजी त्यांची संपत्ती $208 अब्ज होती. Louis Vuitton Moët Hennessy हे जगातील लक्झरी उत्पादनांमधील सर्वात मोठे नाव आहे. हा ब्रँड LVMH या नावाने प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. (हेही वाचा: 2022-23 मध्ये अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; चीन दुसऱ्या क्रमांकावर; 'या' देशांचा टॉप 5 मध्ये समावेश)
फ्रान्समधील रुबेक्स येथे 5 मार्च 1949 रोजी एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेल्या अर्नॉल्ट यांनी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. इकोले पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फेरेट सॅव्हिनेल कन्स्ट्रक्शन कंपनीत अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या कामाच्या जोरावर 1978 मध्ये पदोन्नती मिळवत ते या कंपनीच्या चेअरमनपदापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी एक लक्झरी ब्रँड विकसित केला.