Reshuffle In Pakistani Army: पाकिस्तानने लष्करामध्ये केले बदल, चीफ ऑफ जनरल स्टाफ पदी लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास यांची वर्णी
पाकिस्तानने (Pakistan) आपल्या नवीन चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) ची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास (Lieutenant General Azhar Abbas) हे लष्कराचे 35 वे सीजीएस असतील.
पाकिस्तानने (Pakistan) आपल्या नवीन चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) ची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास (Lieutenant General Azhar Abbas) हे लष्कराचे 35 वे सीजीएस असतील. अब्बास यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा (Lieutenant General Sahir Shamshad Mirza) यांची जागा घेतली आहे. सीजीएस हे पद पाकिस्तानी लष्करातील (Pakistan Army) सर्वात प्रभावी पद मानले जाते. पाकिस्तान लष्करात मोठ्या प्रमाणात फेरबदल करून लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास यांना पुढील चीफ ऑफ जनरल स्टाफ बनवण्यात आले आहे. यापूर्वी अब्बास यांच्याकडे भारतासोबत नियंत्रण रेषेच्या (LOC) सुरक्षेची जबाबदारी होती. लेफ्टनंट जनरल अब्बास हे बलुच रेजिमेंटचे (Baloch Regiment) आहेत आणि लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना रावळपिंडी येथील 10 कोरचे प्रमुख बनवण्यात आले आहे.
मिर्झाच्या आधी अब्बास 10 कॉर्प्सचे प्रमुख होते. पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. रावळपिंडी कॉर्प्स नियंत्रण रेषेचे रक्षण करते. लष्कर प्रमुखानंतर पाकिस्तानी लष्करात चीफ ऑफ जनरल स्टाफ हे पद सर्वात महत्त्वाचे मानले जाते.
सीजीएसला जनरल मुख्यालय मधील गुप्तचर,ऑपरेशनल कार्ये, मिलिटरी ऑपरेशन्स आणि मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टोरेट्स त्याच्या अंतर्गत काम करतात. आयएसपीआरच्या निवेदनानुसार, लेफ्टनंट जनरल मुहम्मद चिराग हैदर यांना मुलतान कॉर्प्सचे प्रमुख बनवण्यात आले आहे, जे पाकिस्तानच्या मुख्य स्ट्राइक कॉर्प्सपैकी एक आहे. हेही वाचा Afghanistan Government Formation: अफगानिस्तानमध्ये सुरु होणार Taliban राजवट; सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी चीन, पाकिस्तानसह 6 देशांना निमंत्रण- Report
लेफ्टनंट जनरल अब्बास यांनी क्वेटा येथील इन्फंट्री स्कूलचे कमांडंट म्हणून काम केले आहे. ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांचे वैयक्तिक सचिव होते. याव्यतिरिक्त, त्याने मुरी येथे एका विभागाचे आदेश दिले आहेत. त्यांनी ऑपरेशन डायरेक्टरेट ऑफ ब्रिगेडियर म्हणूनही काम केले आहे.
पाकिस्तान लष्करात आणखी काही मोठे बदल करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल वसीम अशरफ यांची बदली झाली आणि त्यांना संयुक्त कर्मचारी मुख्यालयाचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. तर लेफ्टनंट जनरल चिराग हैदर मुल्तान कॉर्प्समध्ये जनरल अशरफ यांच्या जागी डीजी जॉइंट स्टाफ मुख्यालय म्हणून काम पाहतील. जनरल अशरफ हे कोर -2 मुलतान आणि दक्षिणी कमांडचे कमांडर होते. जनरल अशरफ आणि जनरल हैदर हे दोघेही फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे आहेत
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)