Azam Cheema Dies In Pakistan: लष्कर-ए-तैयबाचा गुप्तचर प्रमुख आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आझम चीमा याचे पाकिस्तानात निधन
2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आझम चीमा पत्नी आणि दोन मुलांसह पाकिस्तानातील बहावलपूर येथे राहत होता.
Azam Cheema Dies In Pakistan: लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) गुप्तचर प्रमुख आझम चीमा (Azam Cheema) (वय, 70) याचे पाकिस्तानातील फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. चीमा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या अनेक सदस्यांचा गूढ मृत्यू झाला आहे. लष्कर-ए-तैयबाच्या अनेक गुंडांच्या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, भारताने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
चीमा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आझम चीमा पत्नी आणि दोन मुलांसह पाकिस्तानातील बहावलपूर येथे राहत होता. (हेही वाचा -Lashkar-e-Taiba Terrorist Shot Dead: लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मोहम्मद मुझामिल आणि त्याचा सहकारी नईमुर रहमान याची गोळ्या घालून हत्या)
आझम चीमा लष्कराचा कमांडर -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम चीमा अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमधून प्रवास करताना दिसला होता. चीमा 2008 पासून पाकिस्तानातील बहावलपूर येथे एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. त्याला लष्कराचे वरिष्ठ अधिकारी झकी-उर-रहमान लखवी यांचे ऑपरेशनल सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच 26/11 च्या मुंबई हल्ल्याची संपूर्ण योजना पूर्ण करण्याची जबाबदारी आझम चीमा याच्यावर सोपवण्यात आली होती.