भारत विरुद्ध पाकिस्तान: कुलभूषण जाधव खटल्याचे Live Streaming इथे पाहा

या प्रकरणात सुनावणी 16 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केली जाणार आहे. या पिठाचे प्रमुख जज अब्दुलकावि अहमद युसूफ हे आहेत. या खटल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग इथे पाहात येईल.

Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

Kulbhushan Jadhav ICJ Verdict Proceedings Live Streaming:  पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेला भारतीय नागरिक आणि नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांच्यावरील खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज (बुधवार, 17 जुलै 2019) निर्णय देणार आहेत. या खटल्यात भारत सरकार विरुद्ध पाकिस्तान सरकार असे दोन देश एकमेकांविरुद्ध प्रतिवादी आहेत. गेली प्रदीर्घ काळ हा खटला सुरु आहे. आज या खटल्यावर अंतिम सुनावणी होणार असल्याने भारत, पाकिस्तान देशांसोबतच जगभरातील जाणकारांचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या खटल्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमींग (Live Streaming) आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत.

आंतरराष्ट्रीय खटल्यात आपली बाजू मांडण्यासाठी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांच्या वकिलांची फौज न्यायालयात पोहोचली आहे. या प्रकरणात सुनावणी 16 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केली जाणार आहे. या पिठाचे प्रमुख जज अब्दुलकावि अहमद युसूफ हे आहेत. या खटल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग पाहण्यासाठी इथे क्लिक करा. (हेही वाचा, ICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर आज होणार फैसला)

कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवाद अशा दोन्ही आरोपाखाली त्यांना बलूचिस्तान येथे अटक केले. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील मिलिटरी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. पाकिस्तानच्या या भूमिकेविरुद्ध भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून