Korean Air Plane Slid Off Runway: कोरियन एअरचे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरले; थोडक्यात वाचले 162 प्रवाशांचे प्राण, पहा व्हिडिओ

विमानातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजाचा वापर करावा लागला

Korean Air Plane Slid Off Runway (PC - Alan TANGCAWAN / AFP)

Korean Air Plane Slid Off Runway: फिलिपिन्स (Philippines) मध्ये सोमवारी मोठा विमान अपघात टळला. कोरियन एअरचे विमान (Korean Air Plane) फिलिपिन्स विमानतळावर धावपट्टीवरून घसरले आणि मैदानावरील गवतात अडकले. विमानातील 162 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्सपैकी कोणीही जखमी झाले नाही. विमानातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजाचा वापर करावा लागला.

खराब हवामानामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे देशातील दुसरा सर्वात व्यस्त विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आले. रविवारी मॅकटन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरबस A330 विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर इंचॉनहून कोरियन एअर फ्लाइट KE631 च्या सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, असे फिलिपाइन्सच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAP) सांगितले. (हेही वाचा - Toshakhana Case: Imran Khan यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा झटका; निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळली)

सध्या देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मॅकटन आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद आहे. कारण येथे विमाने अडकून पडली आहेत. तसेच अनेक विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कोरियन एअरच्या अध्यक्षांनी लोकांची माफी मागितली आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पावले उचलण्याचा संकल्प केला.

कोरियन एअरचे अध्यक्ष वू केहॉन्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही नेहमी आमच्या ऑपरेशन्समध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देतो आणि आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत." या घटनेत विमानाचेही नुकसान झाले आहे. फिलिपिन्स या घटनेची चौकशी करत आहे.

फिलीपिन्सच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमानातून उर्वरित इंधन काढून टाकले जाईल. कोरियन एअर लाइंस को डॉट ने एका निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथून एअरबस A330 विमानाने धावपट्टी ओलांडण्यापूर्वी दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif