Joe Biden आणि Kamala Harris Inauguration Ceremony मध्ये पाहायला मिळणार Kolam या भारतीय पारंपारिक कलेचा अविष्कार

आमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या सत्ताग्रहण सोहळ्यामध्ये कोलम या पारंपारिक कलेचा अविष्कार पाहायला मिळणार आहे.

Kolam Art (Photo Credits: Twitter)

कोलम (Kolam) या पारंपारिक भारतीय कलेमध्ये स्वागत करण्यासाठी जमिनीवर वेगवेगळ्या भौतिक आकृत्या काढल्या जातात. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या सत्ताग्रहण सोहळ्यामध्ये कोलम या पारंपारिक कलेचा अविष्कार पाहायला मिळणार आहे. कलमा हॅरिस यांचे मूळ गाव तामिळनाडू (Tamil Nadu) असून तेथे कोलम या कलेचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. या व्हर्च्युअल सोहळ्यामध्ये हजारो पेक्षा अधिक कोलम डिझाईन्स बनवल्या जाणार आहेत. यासाठी भारत आणि अमेरिकेमधून 1800 कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

नवीन सुरुवात करताना कोलम सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, असा अनेकांचा विश्वास आहे. वेगवेगळ्या समुदायातील सर्व वयोगटातील लोक एकत्र येऊन इको-फ्रेंडली साहित्यापासून कोलमच्या टाईल्स बनवणार आहेत. स्थानिक प्रोजेक्ट मधून सुरु केलेल्या या कलेला असा प्रतिसाद मिळेल, हे आमच्या अपेक्षेपलिकडे आहे, अशी माहिती Maryland  च्या पुरस्कार विजेते मल्टिमिडिया आर्टिस्ट शांती चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे.

नवीन सत्तेची सुरुवात करताना व्हाईट हाऊसच्या समोर कोलम पॅटर्नच्या डिझाईन्स बनवाव्या असा सुरुवातील प्लॅन होता. परंतु, वॉश्गिंटन डीसी पोलिसांनी आयोजनकांना कॅपिटल हिल जवळ हे डिझाईन काढण्यास परवानगी दिली. परंतु, सुरक्षिततेच्या कारणामुळे ही परवानगी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो कोलम स्टाईल्स एका व्हिडिओमध्ये मर्ज करुन जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या स्वागतासाठी वापरल्या जणार आहेत.

जगभरातून वेगवेगळ्या लोकांकडून आलेल्या कोलम टाईल्स मर्ज करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी पब्लिक स्लूक च्या आर्ट डिरेक्टर Mary Lambert  आणि Lindsey Vance यांनी चंद्रशेखर यांना मदत केली.  दरम्यान, हजारो कलाकार, नागरिक, विद्यार्थी यांनी ऑनलाईन येऊन हजारो कोलम पिसेस एकत्र करण्यास मदत केली. (First Black Defence Seceratry Appointed in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांच्याकडून संरक्षण मंत्री पदावर कृष्णवर्णीय Lloyd Austin यांची निवड)

या प्रोजेक्टमुळे आमच्या विद्यार्थ्यांना एका वेगळ्या संस्कृती बद्दल शिकता आले आणि त्यासोबत ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांचे गणिती कौशल्य देखील वाढले, असे Lambert यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या कोलम प्रोजेक्टमध्ये डेमोक्रेटीक फंड रेजर शेखर नरसिंमा यांच्या पुतणीसुद्धा सहभाग घेतला होता. ही कलाकृती अमेरिकेत असलेल्या वेगवेगळ्या संस्कृतींमागील उर्जेचे प्रदर्शन करते आणि अमेरिकेच्या एकात्मकतेची आठवण करुन देते, असे नरसिंमा म्हणाले.

कोलम प्रोजेक्टसाठी कर्लिफोर्निया, बॉस्टन, न्यू जर्सी आणि अनेक ठिकाणांहून लोकांनी कोलम टाईल्स पाठवल्या आहेत. अगदी लहान मुलांपासून 90 पर्यंतच्या प्रौढांनी देखील यात सहभाग घेतला. त्यामुळे याला मिळालेला प्रतिसाद अगदी उत्तम आहे, असे चंद्रशेखर यांनी म्हटले.