बँकॉक शहराचे दर्शन घडवणारा काचेचा स्कायवॉक; पर्यटकांसाठी ठरत आहे आकर्षणाचे केंद्र (Video)
या स्कायवॉकवरुन संपूर्ण बँकॉक शहराचं दर्शन घडतं.
King Power MahaNakhon Glass Skywalk : वाहनांचा अडथळा टाळण्यासाठी, रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी, सुरक्षिततेसाठी किंवा जलद गतीने मोकळे चालता येण्यासाठी त्याचबरोबर इतर अन्य कारण्यांसाठी स्कायवॉक हा उत्तम पर्याय आहे. तुम्हीही स्कायवॉकचा अनेकदा वापर केला असेल. पण तुम्ही कधी हजार फुटांवरील स्कायवॉक पाहिला आहे का? बँकॉक येथे हजार फुट उंचीची काचेचा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. या स्कायवॉकवरुन संपूर्ण बँकॉक शहराचं दर्शन घडतं.
थायलंडमधील सर्वात उंच इमारत किंग पॉवरच्या 78 व्या मजल्यावर हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. mahanakhon skywalk असे या स्कायवॉकचे नाव असून याची उंची 1030 फूट आहे. या स्कायवॉकची खासियत म्हणजे यावरुन तुम्हाला बँकॉक शहर चक्क 360 अंशात पाहता येणार आहे. पर्यटकांसाठी हा स्कायवॉक आकर्षणाचे बिंदू ठरेल.
तुम्हीही पाहा व्हिडिओ....
या स्कायवॉकवर जाण्यासाठी पर्यटकांना फॅब्रिक बुटीज (protective fabric booties) घालणे आवश्यक असणार आहे.