Kenya Protests Over Tax Raise: केनियात करवाढीविरोधात आंदोलन; जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न
पोलिसांनी आंदोलकांना संसदेच्या मुख्य द्वाराजवळ रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याचंदेखील बघायला मिळालं. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट संसद परिसरात जोळपोळ करण्याचा प्रयत्न केला.
केनिया सरकार त्यांच्या संसदेत एक वित्त विधेयक पारीत करण्याचा प्रयत्नात आहे. हे विधेयक पारीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. केनिया सरकारने करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याविरोधात नैरौबीमध्ये नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेत जोरदार आंदोलन केल आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत केनिया सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. इतकचं नाही, त्यांनी थेट केनियाच्या संसदेत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलकांना पांगवण्याठी पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. या गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण जखमी झाले. (हेही वाचा - 18th Lok Sabha Session: शत्रुघ्न सिन्हा, शशी थरूर यांच्यासह सात खासदारांनी घेतली नाही शपथ; सभापती निवडणुकीतील मतदानापासून राहू शकतात वंचित)
स्थानिक नागरिकांनी केनियाचे राष्ट्रपती रुटो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती रुटो यांनी सत्तेत आल्यानंतर गरिबांच्या हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी याउलट निर्णय घेत, कर वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रपती रुटो यांनी एकप्रकारे जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
पोलिसांनी आंदोलकांना संसदेच्या मुख्य द्वाराजवळ रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याचंदेखील बघायला मिळालं. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट संसद परिसरात जोळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संसद परिसरातील एका इमारतीला आगदेखील लावली. दरम्यान, यावेळी आंदोलकांचा जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा निर्णय घेतला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 10:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

