Flight Catches Fire After Take-Off: काठमांडूहून दुबईला जाणाऱ्या विमानाला उड्डाण केल्यावर आग
ही घटना 24 एप्रिल रोजी घडली. विमानामध्ये सुमारे 150 प्रवासी होते. विमनाला आग लागल्यावर ते आपत्कालीन स्थिती म्हणून तातडीने उतरविण्यात येत असल्याेचे वृत्त होते. दरम्यान, नेपाळ सरकारने स्पष्ट केले की, विमान दुबईच्या दिशेने निघाले आहे.
नेपाळच्या काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Tribhuvan International Airport in Nepal) उड्डाण करुन दुबईला जाणाऱ्या विमानाला हेवत असतानाच आग (Flight Catches Fire After Take-Off) लागली. विमानाने त्रिभुवन येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर पुढच्या अवघ्या काही मिनिटांतच विमानाला आग लागली. ही घटना 24 एप्रिल रोजी घडली. विमानामध्ये सुमारे 150 प्रवासी होते. विमनाला आग लागल्यावर ते आपत्कालीन स्थिती म्हणून तातडीने उतरविण्यात येत असल्याेचे वृत्त होते. दरम्यान, नेपाळ सरकारने स्पष्ट केले की, विमान दुबईच्या दिशेने निघाले आहे.
सरकारने स्पष्ट केले की, दुबईला जाण्यासाठी हवेत झेपावलेले विमान 576 (बोईंग 737-800) आता सामान्य स्थितीत आहे. आपल्या नियोजीत वेळेनुसार ते दुबाईला निघाले आहे. काठमांडू विमानतळ 1614 UTC (स्थानिक वेळेनुसार 09:59 वाजता) येथून निघालेले विमान आता सामान्य आहे, असे नागरी विमान वाहतूक प्राधिकरण नेपाळने एका निवेदनात म्हटले आहे. नेपाळचे पर्यटन मंत्री सुदान किरार्ती (Sudan Kirarti) यांनी पुष्टी केली की विमान दुबईच्या दिशेने जात आहे. विमान त्याच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचत असल्याचेही ते म्हणाले.
ट्विट
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात एकूण 150 प्रवासी होते. त्यापैकी 50 जण नेपाळी होते. प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, टेक ऑफ केल्यानंतर काठमांडूच्या आकाशात विमानाला आग लागल्याचे त्यांनी पाहिले. निश्चित वेळापत्रकानुसार, विमान काठमांडू विमानतळावरून रात्री 7:55 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण करुन करणार होते आणि रात्री 11:05 वाजता (स्थानिक वेळेनुसार) दुबईला पोहोचणार होते. एकूण उड्डाणाचा कालावधी 4 तास 55 मिनिटांचा होता. फ्लाइट स्टॅट्सनुसार, विमानाला आता किमान 1 तास आणि 11 मिनिटे उशीर होईल.
ट्विट
दरम्यान, पीटीआयने सुरुवातीला असे वृत्त दिले होते की, विमान विमानतळावर जबरदस्तीने उतरण्याचा प्रयत्न करत होते. आपत्कालीन स्थिती विचारात घेऊन अग्निशमन दलाला सतर्क ठेवण्यात आले होते. परंतु, नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान सध्या त्याच्या गंतव्यस्थानाकडे जात आहे. कारण धोका टळला असून, इंजिनही सक्रीय आहे.